loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणात रमेशभाई कदम यांना मनसेची ‘कुमक’ भक्कम मताधिक्क्याने विजयी होण्याचा आत्मविश्वास!

चिपळूण (प्रतिनिधी) - चिपळूण नगराध्यक्षपदाचे ‘हेवीवेट’ उमेदवार रमेशभाई कदम यांना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत पाठींबा जाहीर करण्यात आला. रमेशभाई कदम यांना मनसे पक्षाचाही अधिकृत पाठींबा जाहीर झाल्याने त्यांना निवडणुकीत मोलाची ‘कुमक’ प्राप्त झाल्याचे मत चिपळूण शहर व परिसरात व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूण न.प. निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी रमेशभाई कदम निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांना वाढता पाठींबा मिळत असल्याचे दिसून येते. रमेशभाई कदम हे एक कोकणातील ‘हेवीवेट’ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी चिपळूण शहराचे नगराध्यक्षपद भुषविलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात चिपळूण शहरात अनेक विकास कामे कार्यान्वीत झाली आणि चिपळूण विकासाचा पाया घातला गेला. ते चिपळूणचे कार्यसम्राट म्हणून ओळखले जातात. तसेच ते चिपळूण विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले होते. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी चिपळूण मतदार संघासाठी फार मोठे विधायक कार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रमेशराव कदम हे पुन्हा एकदा चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचा चिपळूण शहरात प्रचंड मोठा लोकसंग्रह आहे. सर्वसामान्य जनतेला अडीअडचणीत रात्री बेरात्री देखील धावून जाणारा नेता म्हणून त्यांचा परिचय आहे. चिपळूण शहराच्या मूलभूत समस्यांचा त्यांचा अभ्यास असून त्यावर कोणत्या उपाय योजना करायच्या हे देखील ते पुरेपूर जाणतात. त्यांना समाजाच्या विविध थरातील जनतेचे भक्कम पाठबळ लाभले आहे. रमेशराव कदम यावेळी शिवसेना (उध्दव ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष या आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या पाठीशी दोन्ही मित्रपक्ष मजबुतीने उभे ठाकल्याचे दिसून येते. या महाविकास आघाडीचा मनसे हा घटक पक्ष असल्याने मनसेतर्फे त्यांना एकमुखी पाठींबा जाहीर करण्यात आला. त्यामुळे रमेशराव कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उध्दव ठाकरे) व मनसे या ३ पक्षांच्या आघाडीचे संयुक्त उमेदवार ठरले आहेत.

टाईम्स स्पेशल

राज ठाकरे यांच्या मनसेने रमेशराव कदम यांना एकमुखी पाठींबा जाहीर केल्याने रमेशराव कदम यांचे बळ वाढल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याबाबत रमेशराव कदम यांनी सांगितले की, ‘‘आम्हाला मनसेची ‘कुमक’ मिळाल्याने आमचा आत्मविश्वास मजबुत झाला आहे. आमच्या आघाडीचे कार्यकर्ते मोठे परिश्रम घेत आहेत आणि चिपळूणच्या जनतेचा आम्हाला भक्कम पाठींबा लाभला आहे’’ असे त्यांनी सांगितले. रमेशराव कदम यांनी पुढे सांगितले की, ‘‘आमचे जिवश्च कंठश्च मित्र आ. भास्करशेठ जाधव यांचा दिलखुलास पाठींबा, आघाडीच्या कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, राज ठाकरे यांच्या मनसेने अत्यंत योग्य वेळी दिलेली ‘भक्कम कुमक’, आमच्या आजवरच्या विधायक कार्याची भरभक्कम ‘शिदोरी’, परमेश्वरी आशिर्वाद आणि सूज्ञ चिपळूणकरांचे प्रेम व भक्कम पाठबळ याबळावर आम्ही घसघशीत मताधिक्क्याने विजय संपादन करु आणि चिपळूण नगरीचा सर्वांगिण विकास करुन दाखवू’’ असा दमदार आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg