loader
Breaking News
Breaking News
Foto

निर्मल ग्रामपंचायत झोंबडी यांच्या वतीने झोंबडी काजळीवाडी येथे आरोग्य शिबिरास उर्त्स्फूत प्रतिसाद

आबलोली (संदेश कदम) गूहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथे दोन दिवसांपूर्वी नळपाणी योजनेच्या विहिरीमध्ये कोल्हा सडलेल्या अवस्थेत पडला होता. पाण्याला दुर्गंध येत होती.त्यामुळे झोंबडी काजळीवाडी येथील ग्रामस्थांना या पिण्याच्या पाण्याचा त्रास झाला. येथील ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले, ताप, उलट्या, जुलाब, पोटदुखी यांनी ग्रामस्थ हैराण झाले होते. हा प्रकार काजळीवाडी येथील अध्यक्षांनी, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत झोंबडीचे सरपंच अमूल लांजेकर यांना आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमीटीला सांगितला. ताबडतोब सरपंच अतूल लांजेकर यांनी याची खबर पंचायत समीती गुहागर, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग यांचेसह संबंधित शासकीय यंत्रणेला प्रशासनाला दिली .काल गटविकास अधिकारी शेखर भिलारे, कार्यकारी अभियंता गिरिश पापकर, पवार हे पहाणी करायला आले होते.यावेळी सरपंच अतूल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्या मयुरी लांजेकर, ग्रामपंचायत अधिकारी गोरख सोनावणे, दिपक गायकवाड, साक्षी देसाई यानी आजारी ग्रामस्थांची विचारपुस करुन आरोग्य यंत्रणेमार्फत उपचार सुरु केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच विहिरीतील सडलेल्या अवस्थेतील कोल्हा पाण्याबाहेर काढून ग्रामपंचायतच्या वतीने पाण्याची क्लोरीनेशन, निर्जंतुकीकरण करण्यात आले. पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. यास्तरावर पंचायत समीती गुहागर, आरोग्य विभाग पाणी पुरवठा विभाग तसेच निर्मल ग्रामपंचायत झोंबडी सरपंच अतूल लांजेकर ग्रामपंचायत सर्व‌ सदस्य कमीटी यांच्या वतीने आज दि.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी झोंबडी काजळीवाडी येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये काजळीवाडी येथील ग्रामस्थ महिला, पुरुष, लहान मुले, सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरामध्ये निर्मल ग्रामपंचायत झोंबडी यांचेसह आरोग्य उपकेंद्र गिमवी तसेच प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र तळवळी या प्रथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण टिम या मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रिम कुमार कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी राजेश मोहिते, आरोग्य निरिक्षक मदन जानवळकर, आरोग्य सेवक वैभव जाधव, विकास दुपटे अजय हळये, विशाल चव्हाण, आरोग्य सेविका मोहिनी पानगले, अक्षता पाणकर, आशा सेविका मिनल घोणसे पाटील, पुजा कदम, उर्मिला बाईत, साक्षी सरदेसाई, उपकेंद्र मदतनीस ग्रिश्मा जाधव, वाडी अध्यक्ष सुरेश पालशेतकर, झोंबडी काजळीवाडी उत्कर्ष सेवा मंडळ अध्यक्ष नितिन आंबोवकर, सचिव राकेश शिरकर, उत्कर्ष सेवा महिला मंडळ अध्यक्षा सुषमा पालशेतकर तसेच निर्मल ग्रामपंचायत झोंबडीचे सरपंच अतूल लांजेकर ग्रामपंचायत अधिकारी गोरखनाथ सोनावणे, ग्रामपंचायत अधिकारी दिपक गायकवाड, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्य जैनब ममतुले, मयुरी लांजेकर, पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता शिरिश पापरकर आदींनी हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

टाईम्स स्पेशल

या आरोग्य शिबिरामध्ये काजळीवाडी येथील ग्रामस्थ, महिला, पुरुष, लहान मुले उस्फुर्तपणे बहूसंख्येने सहभागी झाले होते.या संपूर्ण आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि मान्यवरांचा सत्कार करुन सर्वांचे आभार सरपंच अतूल लांजेकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg