loader
Breaking News
Breaking News
Foto

सहकारातून सहकार्य हेच आमचे ध्येय - संचालिका धृवी लाकडे

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - खारवी, समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरी जिल्हा शाखा पूर्णगड या संस्थेच्या वतीने चेअरमन संतोष पावरी याच्या मार्गदर्शनाखाली पूर्णगड येथील विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात सहकार सप्ताह निमित्ताने महिला मेळावा व हळदिकुंकू समारंभ रिध्दीताई आडविरकर यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्था संचालिका धृविताई लाकडे, आकाक्षा डोर्लेकर, जेष्ठ समाजसेविका क्रांती हरचकर, आचल हरचकर (ग्रामपंचायत सदस्य) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खारवी समाज विकास नागरी पतसंस्था या संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम कामगिरी करून दिपस्तभ पुरस्कार प्राप्त केला आहे आणि आज सर्व शाखेतून हा सहकार सप्ताह साजरा केला जात आहे. सहकारातून सहकार्य करण्यासाठी आम्ही तुमच्या पर्यत पोहचत आहोत आणि सर्वांनी बचत कशी करावी, सभासदांना लाभ कसा मिळतो, आणि संस्थेच्या विविध योजना काय आहेत व त्यांचा फायदा आपण कसा करून घ्यावा या विषयी माहिती देवून आर्थिकदृष्टा आपण सक्षम व्हावे त्यासाठी आम्ही सर्वजण पतसंस्थेच्यावतीने आम्ही आपल्या पाठीशी आहोत, असे उदगार धृवी लाकडे यांनी काढले.

टाईम्स स्पेशल

अध्यक्षिय भाषणात रिध्दि आडविरकर यांनी पूर्णगड शाखा व संस्था कशी पूढे पूढे जात आहे, याचे संपूर्ण विष्लेशण केले. यावेळी या कार्यक्रमाला अपेक्षा पेक्षा जास्त उपस्थिती पाहून समाधान वाटले सर्वाचे स्वागत व आभार शाखापालक वासुदेव वाघे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखाधिकारी निखील आबेरकर, पर्णिका आंबेरकर, सदिच्छा पावसकर यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg