loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वांगीण विकासाबरोबरच देवरूख पर्यटन स्थळ व्हावे हेच ध्येय - मृणाल शेट्ये

देवरूख (सुरेश सप्रे) - महीला व युवकांना स्वावलंबी बनविण्याबरोबरच देवरूख शहराच्या पर्यटन विकासाला चालना देत देवरूखचा सर्वागिण विकास करण्यासाठी मी कटीबध्द आहे असे प्रतिपादन मृणाल शेट्ये यांनी बोलताना केले. गत पाचवर्षात शहरातील प्रत्येक वाडी वस्ती वर जाऊन समस्या जाणून घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या कामांमुळेच पक्षाच्या वरिष्ठांनी मला पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी मला संधी दिली आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून राजकारण न करता सर्वांना बरोबर घेत देवरूख शहराचा कायापालट करून देवरूख नगरपंचायत ही जिल्हातील आदर्श नगरपंचायत करण्याचा मानस असल्याचे ही त्यांनी सांगितले. माझा राजकीय पिंड नसताना ही माझे पती अभिजित यांनी ग्रामपंचायत सदस्य. नगरसेवक ते उपनगराध्यक्ष काळात केलेली कामे यामुळेच २०१७ च्या निवडणुकीत ओबीसी महिला आरक्षण पडल्याने पक्षाने मला उमेदवारी दिली होती. जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला विजयी केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजकारणात नवखी असुन ही सर्वांचा सक्रिय पाठिंबा मिळाल्याने मी गत पाचवर्षातील आपल्या कारकीर्दीत अनेक विकास कामे करताना महत्त्वाचे असे घनकचरा व्यवस्थापन. अग्निशमन गाडी. नगरपंचायतीची प्रशस्त अशी प्रशासकीय इमारत, शहरातील वाडीवस्तीवर स्ट्रीट लाईट. भविष्यातील गरज ओळखून नवीन धरण व नळपाणी पुरवठा योजनां मंजूरी. बचत गटातील महिलांना व दिव्यांगासह युवकांना स्वावलंबी होणेसाठी शासकीय योजनांतून मदताचा हात. स्वच्छता अभियानात पहिला क्रमांक मिळवत दहा कोटीचे पारितोषिक अशी महत्वाची कामे पूर्ण करण्यात आलेले यश या बळाबरोबरच महायुतीच्या सर्व नेते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आशीर्वादाने या वेळी ही नगराध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचा विश्वास ही शेट्ये यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

भाजपापक्षांसह महायुतीच्या वरिष्ठ नेतेमंडळीनी सर्व साधारण महीला राखीव जागा असुनही मला पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे. मी आगामी पाच वर्षांत महिलांना व युवकांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच शहरातील विविध पुरातन मंदिरे. वास्तूंसह प्रेक्षणीय स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न करून देवरूख हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊन त्यातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या जल पर्यटनाला चालना देण्यासाठी व शहराच्या विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करीन असे ही शेवटी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg