loader
Breaking News
Breaking News
Foto

डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या वतीने मोफत कर्करोग जागृती शिबिर

डोंबिवली - शिवसेना शाखा कोपर डोंबिवली पश्चिमच्या व इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहकार्याने माजी नगर सेवक रमेश म्हात्रे यांच्या राजाई टॉवर येथील कार्यालयात कॅन्सर जागृती शिबीरचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीप प्रज्वलन केले. या वेळी माजी नगरसेवक विश्वनाथ राणे आणि माजी नगर सेविका वृषाली रणजित जोशी हजर होत्या. या वेळी मोठया संख्येने महिलांनी शिबिराला हजेरी लावली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कॅन्सर हा वेळेवर उपचार केले तर बरा हाऊ शकतो. शिबिरात तोंडाच्या आणि घशाची तपासणी व महिलांची आणि पुरुषांची शारीरिक तपासणी तज्ञ् डॉक्टर व टेक्निशियन यांनी केली. व तज्ञ डॉक्टर्सने मार्गदर्शन केले. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. शाखा प्रमुख चंद्रशेखर खेडेकर, अंकुश उतेकर, विजय राणे, मिलिंद म्हात्रे,अजय भरवाडा, रमेश चिपकर, राकेश जुईकर आणि महिला शाखा प्रमुख भागीरथी माने, हिरा भाभी वाघेला, स्वप्ना शहा, प्रीती अहिरे, सुरेखा कनोजिया, रिया घाडगे, सेजल जेठे आणि दीपा कदम या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg