loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा-शिवसेना महायुतीकडून खेडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल

खेड (प्रतिनिधी) - आगामी खेड नगर परिषद निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात झालेल्या महायुतीनुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जागावाटपाच्या नियमानुसार भाजपा नेतृत्वाने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पक्षाला मिळालेल्या तीनही जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली. पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार मिळालेल्या जागांवर भाजपाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. खेड शहरात गेली २० ते ३० वर्षे सक्रिय राजकीय आणि सामाजिक कार्य करणारे खेडेकर यांनी सांगितले की, २००७, २०११ आणि २०१६ मध्ये जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून सत्ता दिली. त्या अनुभवाच्या जोरावरच या निवडणुकीत महायुती अधिक बळकट करण्यासाठी ते आणि त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना खेडेकर म्हणाले की, "जरी जागा कमी मिळाल्या असल्या, तरी मिळालेल्या सर्व जागांवर आम्ही सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित करू. भाजपाचे कमळ खेडमध्ये मोठ्या डौलाने फुलवू आणि कोकणात भाजपाचा झेंडा उंच फडकवू, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे." खेड शहरातील सर्व धर्मीय नागरिकांचा भाजपाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. "बंधुभाव जपण्याचे कार्य आम्ही अनेक वर्षे केले असल्याने नागरिकांचा प्रचंड विश्वास आमच्यावर आहे. दोन तारखेला मतदानाच्या दिवशी महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील," असेही त्यांनी स्पष्ट केले. खेडेकर यांनी पुढे सांगितले की, पक्षाकडे जागावाटप वाढवण्याची मागणी अद्याप सुरू असून या चर्चेचा भविष्यात सकारात्मक निकाल लागेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. "पक्षाच्या आदेशानुसार आम्ही अर्ज भरले असून खेडच्या विकासासाठी अधिक जागा मिळाव्यात ही आमची प्रामाणिक इच्छा आहे," असे त्यांनी नमूद केले.

टाइम्स स्पेशल

आपल्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना खेडेकर म्हणाले, "आमचे कार्यकर्ते हे दिवस-रात्र उपलब्ध असणारे आहेत. नागरिकांना एका हाकेला धावून जाण्याची ताकद त्यांच्यात आहे. माझ्या नगराध्यक्षपदाच्या काळानंतर शहरातील जी व्यवस्था ढासळली आहे, ती पुन्हा सुरळीत करण्यासाठी जनतेला काम करणारे नेतृत्व हवे आहे. प्रशासकीय राजवटीच्या मर्यादा लोकांनी ओळखल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने काम करणारे कार्यकर्ते नगरपालिकेत पोहोचावेत, हीच जनतेची अपेक्षा आहे." समर्पित कार्यकर्ते, जनतेचा विश्वास आणि विकासाची बांधिलकी यांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg