loader
Breaking News
Breaking News
Foto

तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एचपीव्ही लसीकरण सत्र

खेड (वार्ताहर) : - तालुक्यातील तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या शिरगांव उपकेंद्रातील शिरगांव हायस्कूल व दोन जिल्हा परिषद शाळा तसेच कुंभाड जिल्हा परिषद शाळा येथे नुकतेच आयोजित करण्यात आलेले विषाणूंच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी असणारे HPV लसीकरण सत्र खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. यावेळी 9 ते 14 वयोगटातील लाभार्थी असणाऱ्या सर्व मुलींना लसीकरण करण्यात आले. त्यावेळी प्रा. आ. केंद्र तिसंगी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा खेडेकर यांनी HPV लसीकरणा बाबतीत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. आरोग्य विषयक माहिती सांगितली. यावेळी पालक व शिक्षक, प्रा. आ. केंद्र तिसंगी येथील आरोग्य सहाय्यक एस. सी.पार्टे, आरोग्य सेविका सकपाळ - घाग, शिक्षक डी. पी. चव्हाण, एस. जी. भुवड, एस. पी. फागे, सी. एच. उघडे, व मदतनीस सुरेखा शिंदे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg