loader
Breaking News
Breaking News
Foto

शस्त्रांपासून शिस्तीपर्यंत… मुलांना मिळाली पोलिस सेवेशी पहिली जवळीक

ठाणे (प्रतिनिधी) - वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षांच्या निमित्ताने केंद्र सरकारने वर्षभर विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार कोपरी पोलिस ठाण्याने समाजजागृतीचा एक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. पोलिसांविषयी मुलांच्या मनातील गैरसमज दूर व्हावेत आणि पोलिसांची खरी कामगिरी त्यांना समजावी, या हेतूने कोपरी पोलिसांनी नानिक इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पोलिस स्टेशन अनुभव दौरा’ आयोजित केला. ठाणे पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सुरू असलेली दिवस-रात्र धडपड अनेकांना माहिती असली तरी लहान मुलांना पोलिस कामकाजाविषयी अत्यल्प माहिती असते. त्यांच्या कल्पनेत पोलिस म्हणजे चोर-दरोडेखोर पकडणारे एवढीच मर्यादित ओळख असते. हा गैरसमज दूर करण्यासाठी कोपरी पोलिसांनी प्रत्यक्ष ठाण्यातील कामकाज मुलांना दाखवण्याचा निर्णय घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदणी प्रक्रिया, तपास पद्धती, तक्रार निवारण, ठाण्याचे दैनंदिन काम, तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या पथकांचे कार्य, नागरिकांशी संवाद या सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. यानंतर मुलांना पोलिसांकडील अत्यावश्यक शस्त्रास्त्रांची ओळख करून देण्यात आली. एसएलआर रायफल, ए.के.-47, कार्बाईन, गॅसगन, तसेच हातकडी आणि दोर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कोणत्या परिस्थितीत कोणते शस्त्र वापरले जाते याचे स्पष्टीकरण मुलांना अतिशय रोचक वाटले.

टाईम्स स्पेशल

सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करताना ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचे सुरक्षित वापर नियम, नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहितेची प्राथमिक माहिती, तसेच अमली पदार्थविरोधी गुन्ह्यांचे परिणाम याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षानिमित्त विद्यार्थ्यांकडून उत्साहात समूहगानही घेण्यात आले आणि त्या सुरेल वातावरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीने भारला होता. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार, पोलिस निरीक्षक प्रदीप केरकर, पोलिस उप निरीक्षक सीताराम गावित, रोहिणी नरसिंगे, जितेंद्र खलाटे, सुप्रिया खैरनार आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कोपरी पोलिस ठाण्याचा अनोखा उपक्रम

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg