loader
Breaking News
Breaking News
Foto

महाविकास आघाडीला जोरदार दणका, सावंतवाडीत काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा!

सावंतवाडी (प्रतिनिधी): - सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीपासून फारकत घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करून आघाडीला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासह १७ नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ​काँग्रेसच्या माध्यमातून साक्षी वंजारी यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत १७ इच्छुक उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना वंजारी यांनी, "आम्ही महाविकास आघाडीसोबत नसून स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहोत," असे स्पष्ट केले. तसेच, नगराध्यक्षपदासह सर्व नगरसेवकांचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, माजी नगरसेवक सुनील पेडणेकर, अरूण भिसे, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, समीर वंजारी, तौकीर शेख, बाळा नमशी, संजय लाड, कौस्तुभ पेडणेकर यांसारखे काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्ष: साक्षी वंजारी ​नगरसेवक (प्रमुख नावे): तौकीर शेख, शिल्पा कांबळी, बाळ नमशी, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, स्नेहल मसुरकर, सुनील पेडणेकर, निशाब शेख, ॲड. समीर वंजारी, ॲड. रितू परब, अरूण भिसे, संतोष जोईल, ॲड. प्रज्ञा चौगुले, सुमेधा सावंत, शाम वाडकर, प्रणाली नाईक यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची चिन्हे असून, निवडणुकीच्या रिंगणात आता मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg