loader
Breaking News
Breaking News
Foto

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी माजी आमदार वैभव नाईक आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची भेट

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच अनुषंगाने ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना, मनसे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची महाविकास आघाडी झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा निश्चित करण्यात आली. ​या चर्चेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रभावी प्रचार मोहीम राबवण्यावर भर दिला. ​यावेळी ठाकरे शिवसेना आघाडीच्या उमेदवार सौ. सीमा मठकर, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्यासह आघाडीचे अन्य उमेदवार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ​निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री यांच्यातील या भेटीमुळे महाविकास आघाडीच्या प्रचाराला अधिक बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg