loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम उद्या चिपळूण दौर्‍यावर

चिपळूण (ओंकार रेळेकर) - समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व मुंबईचे आमदार अबू असीम आझमी उद्या बुधवारी चिपळूण दौर्‍यावर येत असून समाजवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोईन पेचकर आणि प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार मुशर्रफ पेचकर यांच्या प्रचारार्थ आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्या बुधवारी खेर्डी येथील हॉटेल तेज ग्रॅण्ड येथून दुपारी ४ वाजता भव्य मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. मिरवणूक बहादूर शेख नाका येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस, तसेच कावीळतली, मार्कंडी आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करणार आहे. यानंतर मिरवणूक बाजारपेठ, गोवळकोट रोड, गुहागर बायपास मार्गे पुढे सरकेल. तसेच मुमताज बँक्वेट हॉल येथे संध्याकाळी ५ वाजता सभा आयोजित करण्यात आली असून, विविध घडामोडींवर मार्गदर्शन तसेच तरुणांना प्रोत्साहनपर संदेश देण्यात येणार आहे. समाजवादी पार्टीचे सदाकत पेचकर यांनी चिपळूण व परिसरातील बंधू-भगिनींना मिरवणूक आणि सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. आमदार अबू आजमी हे प्रथमच चिपळूण दौर्‍यावर येत असल्याने या दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तर अल्पावधीतच समाजवादी पक्षाने चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात आपले पक्ष संघटन वाढविले आहे त्यामुळे या दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg