loader
Breaking News
Breaking News
Foto

देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी दिले : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) - भारताचे संविधान जगात अद्भुत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी लिहिले. त्यानंतर जगभरात या संविधानाचा गौरव केला जातोय. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाबद्दल कृतज्ञता भावना केवळ दलित समाज करीत नसून सर्वच समाज करीत आहे. आज या संविधानाला ७५ वर्षे होत असून संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला पुढे जाण्याचे बळ दिले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली संविधान दिन हा देशभरात संविधान दिन साजरा केला पाहिजे अशी संकल्पना मांडली. देशाचे केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी मोदींनी देशाच्या विकासाठी जे जे निर्णय घेतेले त्यांना पाठिंबा दिला असल्याने आठवले यांचे देखील या संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने आभार आमदार ठाकूर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संविधान गौरव दिन व लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी पनवेल महानगर पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. डोळे तपासणी, सीबीसी, इसीजि, कॅल्शियम तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांचे आजार, तसेच मोफत मल्टीव्हिटॅमिनच्या औषधांसहित खोकला, सर्दीची औषधे मोफत वाटप करण्यात आली. या आरोग्य शिबिराला कर्मचारी वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संविधानाची गौरव गाथा जागविण्याचे निलेश सोनावणे यांनी या संविधान गौरव दिनानिमित्त आयोजन केल्याने त्यांचे अभिनंदन केले. जे पनवेल शहराची सेवा करता त्या पनवेल महानगर पालिका सफाई कर्मचार्‍यांची सेवा आज निलेश सोनावणे मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून करीत असल्याने निलेश सोनावणे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

३६५ दिवस ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपले शहर स्वछ सुंदर ठेवण्याची पनवेल शहराची सेवा करणार्‍या साफसफाई करणार्‍या पनवेल महानगर पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांचे आरोग्य सुदृढ रहावे, निरोगी रहावे याकरिता त्यांची वैद्यकीय तपासणी वेळेचे वेळी होणे गरजेचे आहे, हा संकल्प मनाशी ठेवून निलेश सोनावणे यांनी या शिबिराचे आयोजन केले असल्याचे आपल्या प्रास्ताविकात म्हटले. या कार्यक्रमात पनवेल महानगर पालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, जिल्हा प्रवक्ते तथा पनवेल महानगर पालिका जिल्हा क्षेत्र कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, आधार हॉस्पिटलचे डॉ.संतोष पांढरे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी के.आ.बांठिया विद्यालयाचे प्राचार्य बी.एस.माळी, रिपाई खांदेश्वर शहर अध्यक्ष दिनेश जाधव, आधार हॉस्पिटलचे संचालक डॉ.मिलिंद पराडकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त धावू पाटील, विजय पाटील, मुकुंद कांबळे, कल्पेश कांबळे, संदेश पाटील, मयूर गायकवाड, विकेश पाटील, दीपक भोपी, संजय कांबळे आदींसह सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव विधाते, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, अनिकेत जाधव आदींचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg