loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली जालगांव येथिल विलास जालगांवकर यांची कुंभार समाज कोकण विभाग उपाध्यक्षपदी निवड

खेड (प्रतिनिधी) - कोकण विभागी अद्यक्ष प्रकाश साळवी यांच्या अद्यक्षतेखाली कोकण विभागीय विविध पदाधीकारी निवड पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम दिनांक २६ रोजी श्री संत कुभांर विकास युवक मंडळ चिपळूण यांचे संत शिरोमणी गोरोबाकाका सभागृह खेर्डी येथे संपन्न झाला. महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विलास जालगांवकर यांनी जालगांव ग्रामपंचायत माजी उपसरपंच, जालगांव तंटामुक्त गाव अद्यक्ष, स्थानिक व तालुका कुंभार समाजाच्या विविध पदांवर आत्तापर्यंत अतिशय उत्तम कामगीरी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच सामाजीक क्षेत्रात कार्यरत असताना समाज बांधवांच्या अडचणी समाजावुन घेऊन त्या सोडवण्यासाठी ते अग्रेसर असतात. याचीच दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश कुभांर समाज कोकण विभाग वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडुन त्यांची कोकण विभाग उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच जालगांव येथिल विकास युवक मंडळाचे सदस्य आणि युवा नेतृत्व सचिन कलमकर यांची युवा आघाडी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला कोंकण विभाग उपाध्यक्ष प्रदिप शिरकर , जिल्हा खजिनदार गणपतशेठ जामसूतकर, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रकाश महाराज निवळकर , उपाध्यक्ष दिपक शिरकर , सचिव प्रकाश कराडकर , पतसंस्था चेअरमन तुकारामबाबा साळवी , बबन शेठ पडवेकर, तुकाराम शेठ साळवी, तंटामुक्ती अध्यक्ष बावाशेठ निवळकर ,विठ्ठल जालगांवकर,श्री दत्ताराम पालकर,सखाराम दाभोळकर,किसन नांदीस्कर,रामचंद्र मांडवकर,सचिन वायकर,वधू वर अध्यक्ष तुकारामदादा बुरबाडकर , दापोली माजी अध्यक्ष महेंद्र कलमकर गुरुजी , माजी सरपंच असोंड भरत दाभोळकर , दत्ताराम शिवणकर , संतोष वायकर , सोनू कुंभार , सुनिल पडवेकर , जयसिंग कुंभार सर , युवा आघाडी अध्यक्ष दिनेश वहाळकर , उपाध्यक्ष मंगेश बुरबाडकर , किशोर कलमकर,दत्ताराम शिवणकर,अजित निवळकर व कोंकण विभाग सोशल मिडीया अध्यक्ष रविंद्र शिरकर आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते जालगांव मधील या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होते आहे दापोली जालगांव येथिल श्री विलासजी जालगांवकर यांची कुंभार समाज कोकण विभाग उपाध्यक्षपदी निवड होताच ना योगेश दादा कदम यांनी सत्कार केला

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg