loader
Breaking News
Breaking News
Foto

पाडले येथे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

दापोली (प्रतिनिधी) - पाडले येथील श्री गुरुदेव दत्त मंडळातर्फे मिती मार्गशीर्ष शुद्ध ११ शके १९४७ सोम. दि. १ डिसें. २०२५ ते मार्गशीर्ष कृष्ण २ शनि. दि. ६ डिसें.२०२५ या दरम्यानच्या कालावधीत श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्री दत्त जयंती उत्सव सोहळयानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांसह विविध प्रकारच्या सांस्कृतिक तसेच क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेल्या श्री गुरुदेव दत्त मंडळामार्फत सन १९१७ पासून पाडले गावात श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव सोहळा हा कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा मधला काळ वगळता गेली १०७ वर्ष अखंडीतपणे प्रतीवर्षी त्याच श्रद्धेच्या भावनेने उत्साहात सुरू आहे. श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्याचे मंडळाचे हे १०८ वे वर्षं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये सोम. दि. १ डिसें. ते २ डिसें. दरम्यान सायं. ६ वाजता तालुकास्तरिय भव्य कबड्डी स्पर्धा, गुरु. दि. ४ डिसें. पहाटे ४ वा. काकड आरती, भजन श्री दत्तसेवक भजन मंडळ पाडले, बुवा- जीवन वसंत गुहागरकर, तबला- मंगेश जाधव, प्रशांत मयेकर, स. ९ वा. अभिषेक, दुपारी ३ ते ५ वाजता सभागृह ते देऊळ या दरम्यान दिंडीवारीचा कार्यक्रम, सायं. ५ वा. आंजर्ले येथील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. विजय निजसुरे यांच्या सृश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम, सायं. ७.१५ वा. श्रीदत्तजन्मोत्सव, रात्रौ ८ ते ९ अल्पोपहार, रात्रौ ९ वा. श्री गणेश भजन मंडळ ब्राह्मण आळी यांच्या भजनाचा कार्यक्रम, रात्रौ १० वा. श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ मुंबई, बुवा अनिकेत अनंत वालपकर यांच्या सुस्वर भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ११ वा. श्री दत्तसेवक भजन मंडळ पाडले, बुवा जीवन गुहागरकर, पखवाज श्री.झाडेकर, तबला सिध्देश वेलदुरकर यांच्या भजनाचा जंगी कार्यक्रम. शुक्र. ५ डिसें. रोजी दुपारी १ वा. श्री दत्तात्रेयांचा महाप्रसाद तर शनि. ६ डिसें.ला स. १० वा. श्री सत्यनारायणाची महापुजा, दुपारी ३ वा. सौ.रिया रविंद्र सातनाक यांच्या अध्यक्षतेखाली महिला वर्गासाठी हळदीकुंकू समारंभ, रात्रौ १० वा. श्री दत्तजयंती उत्सवाप्रित्यर्थ संपूर्ण कुटुंबासहीत पहावा असे निखळ मनोरंजन करणारे संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित ‘हिच खरी फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

टाइम्स स्पेशल

श्री दत्त मंदिर पाडले तसेच सत्कार्य नाटय थिएटर पाडले येथे होणा-या काकड आरतीला, किर्तन कार्यक्रमाला, जन्मोत्सव सोहळ्याला, श्री च्या महाप्रसादाला तसेच इतर सर्व आयोजित कार्यक्रमांना भाविक भक्तगणांसह सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री गुरुदेव दत्त मंडळ पाडले, ता.दापोली या रजिस्टर मंडळाचे अध्यक्ष रविंद्र श्रीधर सातनाक, सरचिटणीस जीवन वसंत गुहागरकर, उपाध्यक्ष वैभव वसंत गुहागरकर आणि कार्याध्यक्ष अविनाश वामन बोरकर यांनी कार्यकारी मंडळाच्यावतीने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg