loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्ह्यात राजकीय परिवर्तनाची गरज - प्रा. नामदेवराव जाधव

वावेदिवाळी इंदापूर (गौतम जाधव) - रायगड जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात आता राजकीय परिवर्तनाची गरज असून तुम्ही दर पाच वर्षांनी तेच तेच नेते लोक प्रतिनिधी निवडून देता ते आता बदला नाहीतर तुम्हाला त्याच्या समस्याना समोरे जावे लागेल जर का जुन्या लोक प्रतिनिधी नेत्यानकडून समस्या सुटत नसतील तर आपण ज्या प्रमाणे आराम आला नाही की दवाखाना बदलतो त्या प्रकारे तुम्ही देखील आता लोक प्रतिनिधी नेते बदलने काळाची गरज असल्याचे सनय छञपती शासन पक्षाचे संस्थापक राज्यध्यक्ष तसेच राजमाता जिजाऊ साहेब यांचे वंशज व छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक तसेच वक्ते व शिकागो सर्व धर्म परिषद अमेरिका प्रा.नामदेवराव जाधव यांनी बुधवार दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी माणगांव विश्वामगृह येथे त्यांनी कोणत्याही पक्षाचे व तेत्याचे नाव न घेता ते पञकार परिषदेत बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सनय छञपती शासन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष डाँ.अजय मोरे.माणगांव ता.अध्यक्ष कृष्णा दिवेकर, समाज सेवक जनार्दन माणकर, चारिझेन फांऊडेशन अध्यक्ष कँप्टन रंधवा, अकिता मोरे, तसेच तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.यावेळी पुढे प्रा.नामदेवराव जाधव यांनी बोलताना सांगितले की ज्या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून जो वाद आहे तो आद्याप सुटत नाही ते सरकार व नेते मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न काय सोडवणार. नेहमीच हायवेचे काम काढले जाते परंतु ते केलेच जात नाही कारण ठेकेदारी कोणाला द्यायची यावरून वादा वादी नेत्यानमध्ये होत असल्याने प्रशासनकडून या अशा रस्त्यासारख्या मूलभूत प्रश्नाची उत्तराची कशी अपेक्षा करावी असा खोचक सवाल पक्ष्याध्यक्ष प्रा.नामदेवराव जाधव यांनी बोलताना सांगितले.

टाईम्स स्पेशल

मुंबई गोवा महामार्गचे काम तब्बल १८ ते २० वर्ष रखडलेला असताना चंद्रावर मंगलावर एवढे खड्डे नसतील एवढे खड्डे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पडले आहेत. महामार्गवर खड्डड्याची परिस्थिती भयानक असताना मंञी, आमदार, खासदार, तहसीलदार तसेच जिल्ह्याधिकारी रोज यांच खड्यातून प्रवास करीत असतात. परंतु त्यांना त्याचे काही पडले नाही. तसेच घरोघरी बसवलेल्या अदानी नावाच्या स्मार्ट मीटर बाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला मीटर बसविणे बंधनकारक नसतानाही नागरिकांवर सक्ती होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून हे स्मार्ट मीटर कोणीही बसून घेऊ नका आणि बसवले असतील तर काढून टाका असे सांगितले. तसेच आपल्या सनय छञपती शासन या पक्षाला जनतेत चांगला प्रतिसाद मिळत असून सुशिक्षित तरुणांना आपण येणाऱ्या निवडणूकीत पक्षामध्ये उमेदवारी देऊन येणाऱ्या आगामी निवडणुकात देखील भक्कम यश मिळेल असा विश्वासही प्रा.नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg