loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे आयशर टेम्पोसह गोवा बनावटीचा दारु साठा जप्त

बांदा (प्रतिनिधी) - महामार्गावरील अवैध दारू वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत आयशर ट्रकसह गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त केला. बांदा येथील श्री समर्थ हॉटेलसमोर रचलेल्या सापळ्यात दारू वाहतूक करणारे अडकले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १६ लाख २९ हजार १२० रुपये इतकी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित आयशर ट्रकला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीची अवैध दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली. ट्रकची किंमत १५ लाख, तर दारूची किंमत १ लाख २९ हजार १२० रुपये असून मिळून छ१६ लाख २९ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईत ज्ञानेश्वर महादेव केसरकर (वय ३१, रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) आणि रुपेश शिरोडकर (रा. गोवा) यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई), ८१ व ८३ नुसार बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा व आशिष जामदार यांनी सहभाग नोंदवला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg