loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख पठारवाडी चाफवली रस्त्यावर आलेल्या झाडीमुळे अपघाताची दाट शक्यता

देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख पठारवाडी वाशी ते चाफवली हा रस्ता देवळे मार्गे जाणारा रत्नागिरी कोल्हापूर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर दोन्ही बाजूने आलेल्या झाडीमुळे अपघाताची दाट शक्यता असून या रस्त्यावरची झाडी त्वरित तोडावी अशी मागणी या मार्गाने जाणाऱ्या सर्व वाहन चालकांची आहे. देवळे चाफवली वाशी पठारवाडी देवरुख या रस्त्यावर असलेली झाडी त्वरित तोडण्यात यावी अशी मागणी होत असताना हा रस्ता मागील वर्षीच डांबरीकरण झाला असून संबंधित ठेकेदाराने पाच वर्ष या रस्त्याची देखभाल करावयाची असते, त्यामुळे या रस्त्यावर आलेल्या झाडी मुळे जर का अपघात झाला तर संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची असेल असे मत या मार्गावर चालणाऱ्या वाहनधारकांची आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा रस्ता देवळे पासून देवरुख कडे जाणारा सर्वात जवळचा रस्ता असून रिक्षा ,बाईक, कार, टेम्पो ट्रक यांची कायम वाहतूक चालू असते त्यामुळे हा रस्ता सध्या अति महत्त्वाचा ठरत आहे. या रस्त्यावर मुळातच काही वळण धोकादायक असून पूर्ण झाडी नसली तरीही समोर येणारी गाडी दिसत नाही आणि आज आलेली झाडी व गवत यामुळे दिवसा गाडी दिसत नाहीच परंतु रात्री गाडी चालवणे हे धोकादायकच असल्याचे मत वाहन चालकानी व्यक्त केले आहे. या रस्त्याला काही ठिकाणी वाशी आणि चाफवली मार्गावर बऱ्याच वेळा गवारेडे यांचे दर्शन होते.

टाईम्स स्पेशल

झाडीमुळे कधी कधी हे गवे अचानक रस्त्यावर येतात .दोन्ही बाजूने झाडीमुळे अपघाताची अधिक शक्यता असून या रस्त्यावरची दोन्ही बाजूला आलेली झाडी त्वरित साफ करावी नाहीतर संबंधित अधिकारी वर्गावरती अपघाताची जबाबदारी राहील त्याहीपेक्षा ठेकेदाराला या अपघाताबाबत जबाबदार धरले जाईल. कारण रस्ता केल्यानंतर पाच वर्षे त्याची डागडुजी व देखभाल करणे ही जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg