loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड शिरगांव येथील अपघातात रत्नागिरी टिळकआळीतील हर्षदा जोशी यांचे निधन

खेड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातून सकाळीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंडणगड शिरगांव येथे वॅगनर कार क्र.एमएच-०८-एएक्स-९५८९ या गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डावीकडील बाजूस बरेच अंतर उतारावर कार कोसळत गेल्याचे प्रथमदर्शी पाहणार्‍यांनी सांगितले. यामध्ये रत्नागिरी टिळकआळी येथील ७० वर्षीय हर्षदा जोशी व दापोलीचे मूळ राजापूर देहण गावचे शंकर करमरकर या दोघांचे दुःखद निधन झाले. अपघात इतका भयंकर होता की, अपघातानंतर हे जखमी कुटुंब बराच वेळ गाडीतच पडून असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या अपघातात प्रमोद मुकुंद लिमये, ओंकार प्रमोद लिमये केळशी, दापोली हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. परिसरात या घटनेची माहिती मिळताच तातडीने शिरगांव ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी मंडणगड रुग्णालयात गंभीर जखमींना हलविल्याचे समजते. या अपघाताने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हर्षदा जोशी या काही दिवसांपूर्वी दापोली येथे नातेवाईकांकडे गेल्या असल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg