loader
Breaking News
Breaking News
Foto

करंजाणी येथे वराडकर कॉलेजच्या एनएसएस विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन

दापोली (वार्ताहर) - करंजाणी, ता. दापोली (जि. रत्नागिरी) येथे वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचा उद्घाटन सोहळा ग्रामपंचायतीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दापोली तालुक्याचे पोलीस निरीक्षक महेश महादेव तोरसकर उपस्थित होते तर अध्यक्षस्थान आर. व्ही. बेलोसे फाउंडेशनचे सभापती धनंजय यादव यांनी भूषविले. त्यांच्यासह फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती जानकीताई उदय बेलोसे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कर्‍हाड यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धनंजय यादव यांनी समाजासाठी अशी कामे करण्याचे आवाहन केले की ज्या कामामुळे गावातील लोक स्वतःहून ‘पार्टी देतील’; एनएसएस हे समाजात शिस्त, सेवा, प्रामाणिकता आणि नेतृत्वाची खरी ओळख निर्माण करणारे व्यासपीठ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पुढे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधताना सिनेमांमध्ये व्यसन करणारे पात्र ‘हिरो’ म्हणून दाखवले जातात, परंतु खरे हिरो म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांसारखे समाजप्रबोधन करणारे महापुरुष असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सध्याच्या मोबाईल युगाचा संदर्भ देताना ते म्हणाले की त्यांच्या काळात मोबाईल नव्हता; त्यामुळे मैदानावर वाढलेली आमची पिढी अधिक सक्षम, निरोगी आणि संस्कारी घडली, आणि त्याचप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनीही समाजमान्य, लोकाभिमुख, अनुशासित आणि जबाबदार वर्तन ठेवणे हीच खरी अपेक्षा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यानंतर प्राचार्य डॉ. भारत कर्‍हाड यांनी एनएसएसचे तत्वज्ञान स्पष्ट करताना संवेदनशील, सामाजिक भान असलेला नागरिक घडवणे हा एनएसएसचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांची बौद्धिक शक्ती विकसित केली जाते, तर शिबिर त्यांची सामाजिक, भावनिक, नैतिक आणि नेतृत्व शक्ती वाढवण्याची संधी देत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक स्वयंसेवकाने राष्ट्रभावना, सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देत सेवा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाला करंजाणी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजकुमार यादव पोलीस दापोली पोलीस ठाणे, सरपंच लहू साळवी, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश कालेकर,रवींद्र कालेकर, चेअरमन शालेय शिक्षण समिती ए.जी.हायस्कूल दापोली,विकास समितीचे चेअरमन तानाजी कालेकर, उपसरपंच सौ. समिक्षा कालेकर, ग्रामसेवक रूपेश शिंदे, विकास कालेकर माजी उपसरपंच, पोलीस पाटील मयूर विटले, सायली बारस्कर, स्वाती पारदुले, हायस्कूलचे शिक्षक काशीद सर, शाळेच्या मुख्याध्यापिका कराड मॅडम, सुरेश आग्रे, राजेंद्र कालेकर तसेच माजी सरपंच आणि विविध समित्यांचे सदस्य आणि महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. शिबिराच्या सात दिवसांच्या कालावधीत म्हणजे २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ दरम्यान स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहिमा, ग्रामसर्वेक्षण, आरोग्य जनजागृती उपक्रम, सार्वजनिक बांधकामे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रामीण विकासासाठी उपयुक्त अशा विविध सामाजिक कृतींचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. एकूण ६० विद्यार्थिनी आणि ४० विद्यार्थी असे १०० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले असून त्यांचा उत्साह, शिस्त आणि सेवाभाव पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शेवटी प्रकल्पाधिकारी प्रा. जनार्दन गिरमकर यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg