loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये कलाविष्कार आणि आस्वाद या विषयावर आधारित व्याख्यान

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ रत्नागिरी यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये कलाविष्कार आणि आस्वाद व्याख्यान या विषयावर आधारित व्याख्याते प्राचार्य कृष्णाजी कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न्न झाले. सदर कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात व्याख्याते कृष्णाजी कुलकर्णी, संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक राकेश आंबेरकर, समर्थ ग्रंथालय मुरडेचे अध्यक्ष शशांक सिनकर, समर्थ ग्रंथालय मुरडेचे सचिव श्यामसुंदर दळवी, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. तद्नंतर संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृष्णाजी शामराव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये संत साहित्य हे मराठी संस्कृतीचे अमूल्य वैभव असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये मातृभाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांची महत्त्वाची भूमिका असते. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना वाचनाचे वेड असले पाहिजे. त्यांनी मनापासून वाचन करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. पालकांनी मुलांना प्रश्न विचारण्यास, नवीन कल्पनांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. जेव्हा पालक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ काढतात तेव्हा ते त्यांच्या मुलाची बौद्धिक उत्सुकता वाढवतात. यामुळे त्यांना समस्या सोडवण्याची आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करण्यास देखील मदत होते, जी आधुनिक शिक्षणात महत्त्वाची आहेत, असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर खेड तालुका ग्रंथालय संघ यांच्यावतीने राकेश आंबेरकर यांच्या हस्ते व्याख्याते कृष्णाजी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी सावर्डेकर व आभार प्रदर्शन बाळासाहेब राऊत यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg