loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणात आ.भास्कररावांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा विजय नक्की: रमेशभाई

चिपळूण (वार्ताहर): शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शंभर टक्के उमेदवार निवडून येतील असा विश्वास चिपळूण नगरपालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशभाई कदम यांनी व्यक्त केला. अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांसोबत आमचे असलेले नाते व संबंध पाहता ते नगराध्यक्ष पदासाठी मला निश्चित सहकार्य करतील असेही माजी आमदार आणि उमेदवार रमेशभाई कदम म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिपळूण नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मंगळवारी प्रचाराचा शुभारंभ झाला. या प्रभागात उबाठा शिवसेनेतर्फे अजय भालेकर, वैशाली कदम हे निवडणूक लढवीत आहेत. उक्ताड येथील गणपती मंदिरात दर्शन घेऊन उबाठा शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाग ४ मध्ये प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी संपन्न झाला. गेल्या आठ वर्षांमध्ये चिपळूण नगर परिषदेत जो कारभार झाला आहे त्याला चिपळूणची जनता अक्षरशः कंटाळली आहे. लोकांना बदल पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा परिवर्तनाची लाट चिपळूणमध्ये आली आहे. आमच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमच्या विजयाची नांदी आहे असे रमेशभाई कदम म्हणाले.

टाइम्स स्पेशल

मागील कार्यकाळात नगरपालिका मार्फत दर्जाहीन कामे झाली. या कामांना जनता पक्षाच्या कंटाळली आहे अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा आपणास मिळेल का असे विचारले असता रमेशभाई कदम म्हणाले ते आमचे जुने मित्रच आहेत. निश्चितपणे ते आम्हाला सहकार्य करतील. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी माझं असलेले नातं व असलेले संबंध याचा चांगला फायदा आम्हाला या निवडणुकीत होईल. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर,ओबीसी तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, शहर कार्याध्यक्ष शिरीष काटकर, शहरअध्यक्ष रतन पवार, बाबा भालेकर, भैया दिवाळे, राम गोरीवाले, किसान चिपळूणकर,वैभव चिपळूणकर, अनंत किजळकर, छाया खातू, विराज खातू, बापू दळी, राजू भोसले, मंगेश वेसविकर, महेश वेसविकर आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg