loader
Breaking News
Breaking News
Foto

छोटयांना रत्नागिरीत बाजू सेफ करताना थोरल्यांना मात्र अपशकुन करण्याची खेळी, लांज्यातील बंडखोरीला थेट सिंधुदुर्गातून बळ ?

लांजा ( टाइम्स प्रतिनिधी) : नगरपालिकांच्या प्रचाराला आता चांगलाच जोर चढला असून महायुती व आघाडीच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. मात्र याचवेळी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या रंगलेल्या चर्चानी प्रचाराची धुळवड जोरात रंगल्याचे दिसत आहे. रत्नांग्रीत छोट्या साहेबांना “ऑल इज क्लिअर” करणाऱ्या नेत्यांनी थोरल्या साहेबांना अपशकुन करण्याची धूर्त खेळी खेळण्यात आल्याचे बोलले जात आहे. लांजा नगरपचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिहेरी लढत आहे. महायुतीकडून सावली सुनिल कुरूप, आघाडीकडून पूर्वा मंगेश मुळे आणि भाजपाचे युवा नेते संजय यादव यांच्या पत्नी प्रियांका संजय यादव अशा तिघी रिंगणात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व जागांवर अर्ज भरले आहेत. ज्येष्ठ भाजपा नेते विजय कुरूप यांचाही भाजपाच्या उमेदवाराना सक्रिय पाठींबा आहे. महायुतीने केवळ एकच जागा दिल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यानी संतापून सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बंडखोरी मोडीत काढण्यासाठी रत्नागिरीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे जातिनिशी आले होते.मात्र लांजाकडे शीर्षस्थ नेत्यांचे झालेले दुर्लक्ष अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे. भाजपाचे तडफदार युवा नेते संजय यादव हे एनटीआर यांचे कट्टर समर्थक आहेत. भाजपाचे मंत्री नितेश राणे यांचा त्यांच्यावर विशेष मर्जी आहे. लांजा शहरातील नागरी समस्यांकडे संजय यादव यांनी नामदार नितेश राणे यांचे लक्ष वळविलेले आहे. शहराच्या डीपीआरवर नागरिकांची जबर नाराजी असून लोकांची घरेदारे उध्द्वस्त करणारा डीपी प्लॅन रद्द करण्याचा शब्द मंत्री नितेश राणे यांनी दिलेला आहे. संजय यादव यांनीसुद्धा भाजपाच्या पॅनेलच्या प्रचारात तोच मुद्दा पुढे आणला आहे.

टाइम्स स्पेशल

यामुळे लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्व अपक्ष उमेदवारांना थेट सिंधुदुर्गातून पाठबळ मिळत असल्याची चर्चा लांजा शहरात सुरू आहे. आतल्या गोटातून असं सांगण्यात येत आहे की छोटे एनटीआर लांजा कुवे भागात भाजपाच्या अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी धावता दौरा करणार आहेत. हा सारा प्रकार म्हणजे थोरल्या साहेबांना अपशकुन करण्याचा प्रकार असल्याचे त्यांच्या सामर्थकांमध्ये बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg