loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली उपजिल्हा रुग्णालयात एक्स-रे रिपोर्ट मिळत नसल्याने रुग्णांचे हाल

संगलट (खेड) (प्रतिनिधी) - कोकणातील ग्रामीण आरोग्याचा कणा समजल्या जाणाऱ्या दापोली उपजिल्हा रुग्णालयात सध्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र दिसत आहे. रुग्णालयातील एक्स-रे मशीन सुरू असूनही रुग्णांना वेळेवर एक्स-रे रिपोर्ट मिळत नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातून येणारे ज्येष्ठ नागरिक आणि गरीब रुग्णांना याचा मोठा फटका बसत असून, त्यांना खाजगी लॅबचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून, खेड्यापाड्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येतात. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी असते. अंगात त्राण नसतानाही एसटी बसने किंवा खाजगी वाहनाने प्रवास करून हे रुग्ण रुग्णालयात पोहोचतात. मात्र, डॉक्टर तपासणीनंतर एक्स-रे काढायला सांगतात तेव्हा खरा मनस्ताप सुरू होतो. एक्स-रे काढल्यानंतर त्याचे रिपोर्ट (फिल्म किंवा डिजिटल प्रिंट) वेळेवर मिळत नाहीत किंवा मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे केले जाते. यामुळे रुग्णांना तासनतास ताटकळत बसावे लागते किंवा रिकाम्या हाताने घरी परतावे लागते.

टाइम्स स्पेशल

केवळ रुग्णच नाही, तर रुग्णालयातील डॉक्टरही या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. हाडांचे विकार, छातीचे विकार किंवा अपघातासारख्या केसेसमध्ये 'एक्स-रे' हा निदानाचा मुख्य आधार असतो. मात्र, वेळेवर आणि स्पष्ट रिपोर्ट हातात नसल्यामुळे रुग्णाचे नक्की काय दुखणे आहे, हे समजणे डॉक्टरांना कठीण जात आहे. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg