loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्गमध्ये जिल्हास्तरीय १४ आणि १६ वर्षाखालील मुलांची अ‍ॅथलेटिक मीट

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा हौशी अथलेटिक असोसिएशनच्या वतीने जिल्हा स्तरीय १४ आणि १६ वर्षाखालील मुलांची अथलेटिक मीट आयोजित करण्यात येत आहे. या मीट मधून आणी अस्मिता लिग मधून एकूण १३ मुलांची निवड करण्यात येणार आहे. आणि या मुलांचा संघ अंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाईल वा तो संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल. त्यापूर्वी शिबीर आयोजित केली जाईल. शिबिरात सहभागी होणार्‍यास संधी दिली जाईल. १४ वर्षा खालील मुले जन्म तारीख २१ डिसेंबर २०११ तें २० डिसेंबर २०१३ या कालावधीत जन्म झालेला असला पाहिजे. १६वर्षा खालील मुले जन्म तारीख २१ डिसेंबर २००९ तें २० डिसेंबर २०११, १४ वर्षा खालील मुलगे इव्हेंट ट्रायाथलॉन ए - ६० मी. धावणे, लांब उडी (५ मी. रन अप्रोच),उंच उडी आणि ट्रायाथलॉन- बी- ६० मी. धावणे, लांब उडी (५ मी. रन अप्रोच), (बॅक थ्रो) तर ट्रायाथलॉन - सी - ६० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे स्पर्धा होणार आहे. या पैकी कोणत्याही एका ट्रायथालोन क्रीडा प्रकारात भाग घेता येईल आणी किड्स भाला फेक ह्यात सर्वांनी कम्पलसरी भाग घ्यायचा आहे) ट्रायथालोन २०० रु शुल्क तर भालाफेकसाठी. १०० शुल्क आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१६ वर्षा खालील मुलांसाठी इव्हेंट मध्ये, ६० मी धावणे, ६०० मी धावणे, गोळा फेक स्टँडिंग थ्रो), थाळी फेक भाला फेक (५०० सअ‍ॅरा, १० मी. मीटर रन अँप्रोच), लांब उडी, उंच उडी (सीझर),एक खेळाडू कोणत्याही दोन इव्हेंट मध्ये भाग घेऊ शकतो. एका इव्हेंट करता शंभर रुपये शुल्क असून ओरिजिनल जन्म दाखला आवश्यक आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर पालिका, महा नगर पालिका यांचे दाखले ग्राह्य धरले जातील. त्या शिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मेरिट सर्टिफिकेट आणी मेडल दिले जाईल. या स्पर्धे नंतर राज्य स्पर्धा नाही. राष्ट्रीय अंतर जिल्हा अथलेटीक मीटसाठी निवड केली जाईल. त्यासाठी निवड समिती असेल. शिबीर आयोजित केलें जाईल त्यातून संघ निवडला जाईल. संघ तेरा जणांचा संघ निवडला जाईल स्पर्धा दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता क्रीडा संकुल ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभागी भागी व्हावे. असे आवाहन रणजितसिंग राणे, अध्यक्ष, सचिव कल्पना तेंडुलकर, आयोजक सचिव बाळकृष्ण कदम, आणि प्रमुख सल्लागार अजय शिंदे यांनी केलें आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg