loader
Breaking News
Breaking News
Foto

नापणे काचेच्या पुलाजवळ आवश्यक सुविधांची पूर्तता करण्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी येथील नापणे येथील उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलामुळे तालुक्याच्या पर्यटनाला एक वेगळी दिशा मिळत आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटक या पुलास भेट देण्यासाठी येत आहेत. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता तेथे पायाभूत सुविधांची पर्यटकांकडून वारंवार मागणी होताना आढळून येत होती. ही बाब लक्षात घेऊन वैभववाडी पं.स.चे माजी सभापती बंड्या मांजरेकर यांनी काचेच्या पुलाजवळ पर्यटकांसाठी सुलभ शौचालय व अन्य पायाभूत सुविधांची पुर्तता करावी याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलिप तळेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तरळा माजी सरपंच शैलेश सुर्वे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg