दाभोळे : आगामी 2025/2026 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने दाभोळे जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये स्वबळावर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. तिन्ही जागांवर ताकद दाखवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला असून ही माहिती पंचायत व जिल्हा परिषद प्रतिनिधींनी दिली.
प्रस्थापित पक्षांनी बहुजन समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, “आमचा विकास कोण करणार यावर आता विश्वास उरलेला नाही. बहुजन, ओबीसी, एसटी, एससी, मुस्लिम बांधवांना एकत्र घेऊन सत्ताबदल घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे,” असे प्रतिनिधींनी सांगितले. तळागाळातील उपेक्षित, वंचित घटकांना संधी देत उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेनंतर राज्यभरात पक्षाबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. “स्थापन झाल्यापासून सातत्याने विरोधी भूमिका निभावणारा हा एकमेव पक्ष आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या मतदारांचा कल वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने झुकत आहे,” असा दावा पक्ष कार्यकर्त्यांनी केला.
गावोगावी, शहरांत, मुंबईत तसेच तरुणाई व महिला पुरुषांमध्ये पक्षाचा सूर उमटत असल्याने आगामी निवडणुकीत याचा निश्चितच लाभ होणार असल्याचा विश्वास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. “आमचा विकास हाच आमचा ध्यास आणि जनतेचा विश्वास,” असे म्हणत पक्षाने निवडणूक रणांगणात उतरण्याची स्पष्ट घोषणा केली आहे.











































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.