loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेबांबर-ख्रिश्चनवाडी येथे प्रथमच ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

तिलारी (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाच्या गौरवशाली ७५ वर्षांच्या निमित्ताने, दोडामार्ग तालुक्यातील झरे-२ येथील ख्रिश्चनवाडी येथे 'संविधान दिन' आणि 'संविधान जागृती कार्यक्रम' मोठ्या उत्साहात पार पडला. ‘समाज जागृती मंच, दोडामार्ग’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम ख्रिश्चनवाडी येथे प्रथमच होत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैतान डिसोझा होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून झरे-२ ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रुती गवस (देसाई), दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, बार्टीचे समतादूत ॲड. सगुण जाधव, विनिता घाडी शिवसेना (उबाठा)महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख, आणि युवा वक्ते जेम्स डिसोझा, प्रथमेश नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक जाधव यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बार्टीचे समतादूत आणि प्रमुख वक्ते ॲड. सगुण जाधव यांनी संविधानातील मूलभूत मानवी मूल्ये उपस्थितांना सोप्या भाषेत समजावून सांगितली. ते म्हणाले, "ख्रिश्चनवाडी सारख्या भागात पहिल्यांदाच संविधानाचा असा कार्यक्रम होत आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे." यासाठी त्यांनी आयोजक 'समाज जागृती मंच'चे विशेष कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि संविधानाचा आजपर्यंतचा प्रवास यावर प्रकाश टाकला. कायदे आणि अधिकार याची माहिती त्यांनी अतिशय साध्या व सरळ भाषेत ग्रामस्थांना दिली. "संविधान हेच आपले खरे शस्त्र आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे अस्त्र आहे," असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साटेली-भेडशी चर्च कमिटी मेंबर व माजी ग्रामपंचायत सदस्य जेनिफर लोबो यांनी केले. या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

समाज जागृती मंच’चा स्तुत्य उपक्रम

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg