loader
Breaking News
Breaking News
Foto

‘संपन्न राजापूर’साठी ‘बिझनेस हब’ निर्माण करण्याचा आमचा दृढ निर्धार : सौ.हुस्नबानू खलिफे

राजापूर (प्रतिनिधी) - ‘‘आमची राजापूर नगरी मुंबई - गोवा महामार्गालगत असून राजापूरला वाहतूकीच्या विविध सोयी उपलब्ध आहेत हे ध्यानी घेऊन राजापूर शहर हे कोकणचे ‘बिझनेस हब’ बनवण्याचा आम्हा सर्वांचा निर्धार आहे. त्यामुळे राजापूर शहरातच नव्हे तर परिसरातही उद्योग व्यवसायांना बरकत येईल, तरुण, तरुणींना रोजगार मिळेल आणि राजापूर वासियांच्या हातात बक्कळ पैसे खुळखुळू लागतील.. त्यासाठी नागरी सुधारणांसोबतच राजापूर नगरी ‘बिझनेस हब’ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करणार आहोत’’ असे खणखणीत प्रतिपादन महाआघाडीच्या राजापूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. हुस्नबानू खलिफे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर दै. ‘रत्नागिरी टाइम्स’साठी त्यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी सौ. हुस्नबानू खलिफे जनतेच्या गराड्यात असूनही त्यांनी शांत चित्ताने मुलाखत दिली. सौ. हुस्नबानू खलिफे या एक शालीन, सुसंस्कृत तसेच कर्तबगार, कर्तव्यतत्पर आणि जनहितदक्ष व सदैव जनतेच्या अडीअडचणीत धावून जाणार्‍या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी सांगितले, ‘‘आमच्या राजापूर शहराची भौगोलिक रचना पाहता काही मूलभूत समस्या आहेत. महापूराची समस्या, महामार्गालगत असल्याने भेडसावणारी कचर्‍याची समस्या, त्यामुळे उद्भवणारी नागरिकांच्या आरोग्याची समस्या तसेच पिण्याचे पाणी अशा महत्वाच्या बाबींवर आम्हाला सर्व प्रथम मार्ग काढावा लागेल. त्यासाठी राजापूर नगरीच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ आम्ही तयार केला आहे’’ असे त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg