loader
Breaking News
Breaking News
Foto

सौ.वृषाली टाकळे यांची 'कोकणरत्न' पदवीसाठी निवड

रत्नागिरी- स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे कवयित्री सौ.वृषाली टाकळे, रत्नागिरी जिल्हाध्यक्षा, 'नक्षत्राचं देणं' काव्यमंच पुणे यांची कोकणरत्न पदवीसाठी निवड झाली आहे. कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा शनिवार दिनांक 13 डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सचिन कळझुनकर यांची उपस्थिती लाभणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सौ.वृषाली टाकळे, रत्नागिरी यांच्या 'रंग कवितेचे' या पहिल्याच काव्यसंग्रहाला सात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच आजपर्यंत जिल्हास्तरीय- ७९ व राज्यस्तरीय - ३५ काव्य मानांकन / पुरस्कार प्राप्त झाले आहेत. १४ ई बुक्स आणि १६ प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. नक्षत्राचं देणं काव्यमंच कवी कॅलेंडर, श्री, काव्यानंद, भालचंद्र इ.अंकात कवितांचा समावेश आहे. तसेच 'संकल्प कलामंच' रत्नागिरी वतीने त्यांना गुणवंत कवयित्री म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांचा सफर कवितेची हा नवीन काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. सौ. वृषाली टाकळे, रत्नागिरी यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत कोकणरत्न पदवीसाठी वरील निवड करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg