loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गटानं भाजपचं टेन्शन वाढवलं, थेट मोठी घोषणा

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता प्रचार रंगात आला आहे, दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर राज्यात लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो. आता महापालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी अजित पवार गट सोलापूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आगामी सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागात आणि 102 जागा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. यामध्ये किमान 75 जागा जिंकून सत्तेत येऊ, अशा विश्वास यावेळी बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

टाइम्स स्पेशल

भाजप सत्तेत असतानासुद्धा सोलापूर शहराचा मागील पाच वर्षात अपेक्षित असा विकास झालेला नाही. रस्ते, झोपडपट्टीचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. भाजपात जसे इनकमिंग सुरू आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे सध्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत ती संख्या 75 वर गेलेली दिसेल, आम्ही सोलापूरसाठी ‘अब की बार 75 पार’चा दिलेला नारा यशस्वी करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करणार आहोत. सोलापुरात एमआयएम पक्षाचे एकूण 9 नगरसेवक होते. त्यापैकी 6 नगरसेवक ऑलरेडी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात आलेले आहेत. उर्वरित 3 जणांबरोबर बोलणे सुरू आहे. लवकरच ते तीनही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील, असंही यावेळी बनसोडे यांनी म्हटलं आहे.दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यामुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीत कोणाचे आव्हान असेल असं मला वाटत नाही, आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या धरतीवर सोलापूर शहराचा विकास करू, असं बनसोडे यांनी म्हटलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg