loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण प्रभाग सात चे उमेदवार सौरभ ताम्हणकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

मालवण (प्रतिनिधी) - मालवणच्या सामाजिक क्षेत्रात गेली दहा वर्षे काम करीत असताना शहर विकासासाठी अनेक उपक्रम मी राबविले आहे. या उपक्रमात प्रामुख्याने सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य विषयक उपक्रम यांचा समावेश आहे. मला असलेल्या सामाजिक क्षेत्राची आवड लक्षात घेऊन म्हणा किंवा माझ्या या कार्याची दखल भाजपने घेऊन मला प्रभाग सात मध्ये उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरविले आहे. आमच्यासाठी प्रभाग आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हा महत्वाचा असल्यामुळे मतदारांनी आम्हाला साथ दिल्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे हे मालवण शहर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वांग सुंदर बनविण्याचा आमचा मानस आहे, असे प्रतिपादन प्रभाग सात अ चे भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी येथे बोलताना केले. मालवण शहरातील प्रभाग सात अ मधून भाजप पक्षाच्या वतीने सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर आणि प्रभाग सात ब मधून दिपाली दिलीप वांगणकर या कमळ निशाणी वर निवडणूक लढवीत आहे. गेल्या चार दिवसात डोअर टू डोअर प्रचार करणाऱ्या सौरभ ताम्हणकर आणि दिपाली वायंगणकर यांना मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत या सुद्धा या प्रचार यंत्रणेत सामील झाले आहे. यावेळी मतदारांशी संवाद साधताना सौरभ ताम्हणकर यांनी प्रभागातील विकासाचे प्रश्न असतील किंवा एकूणच मालवण शहराच्या विकासाच्या दृष्टीने काय करता येईल याविषयी मतदारांसमोर आपले विचार मांडले आहे. मालवण शहराच्या विकासाबाबत बोलताना श्री सौरभ ताम्हणकर यांनी मी प्रभाग आठमध्ये इच्छुक असताना पक्षाच्या आदेशाने मी प्रभाग सातमध्ये निवडणूक रिंगणात उतरलो आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्ष आदेश माझ्यासाठी महत्वाचा असल्याने पक्षासाठी मी आता सात प्रभागाच्या सेवेसाठी कार्यरत होणार आहे. आतापर्यंत प्रभाग आठमधील जनतेच्या सेवेसाठी योगदान दिलेले असताना समाजकार्य आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा दांडगा अनुभव माझ्याकडे आहे. आता मी प्रभाग सातमधून निवडणूक लढवित असल्याने याठिकाणच्या मतदारांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रभागात अत्यावश्यक सेवा-सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सांगून ते म्हणाले या प्रभागात भाजपला मानणारा मोठा वर्ग असल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आमचे घरच या मतदारसंघात असल्याने याठिकाणच्या समस्या आणि जनतेचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत. आम्ही नगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मतदारांनी आम्हाला संधी दिल्यास आम्ही सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी या प्रभागातून भाजपच्या नगरसेविका विजयी झाल्या होत्या, त्यामुळे याठिकाणी भाजपला साथ देणारा मतदार असल्याने त्यांच्या बळावर आम्ही यशस्वी होऊ, असाही विश्वास श्री ताम्हणकर यांनी व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

ताम्हणकर पुढे म्हणाले, या प्रभागात विकासात्मक योजना राबवून सर्वांना सोबत' घेऊन जाण्यासाठी मी आणि माझ्या सहकारी उमेदवार या कार्यरत राहणार आहोत. प्रभागाचा परिपूर्ण नियोजनबद्ध विकास आराखडा आपण बनवून जनतेची बाजू जाणून घेणार आहोत. शासकीय जमिनींचा वापर बालोद्यान, ज्येष्ठांसाठी नाना-नानी पार्क, युवकांसाठी व्यायामशाळा अशा योजना राबवून प्रभागाला विकासाच्या प्रक्रियेत अग्रक्रमावर नेण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. जनतेच्या दारात जाऊन जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी मी कार्यरत राहणार असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg