loader
Breaking News
Breaking News
Foto

बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित नृत्य स्पर्धेत केंद्र शाळा रायपाटण नंबर १ ची दुर्वा पराडकर तृतीय

खेड (प्रतिनिधी) - बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित व बालरंग भूमी परिषद रत्नागिरी शाखा संयोजित जल्लोष लोककलेचा महोत्सव 2025 ही स्पर्धा खारवी समाज भवन श्री दामोदर लोकरे सभागृह उद्यम नगर रत्नागिरी येथे संपन्न झाली. या स्पर्धेतील एकल नृत्य स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्र शाळा रायपाटण नंबर १ ची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी दूर्वा मंगेश पराडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. गतवर्षी चिपळूण येथे झालेल्या याच स्पर्धेमध्ये दूर्वा हिने प्रथम क्रमांक पटकावला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दूर्वाने सादर केलेल्या लावणी नृत्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 17 वर्षाखालील या गटामध्ये इयत्ता पाचवीतील या छोट्या विद्यार्थिनीने सादर केलेले नृत्य अफलातून होते. दुर्वा पराडकर हिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg