loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद, ॲड. निता सावंत-कविटकर याच आमच्या उमेदवार'

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी त्यांची तब्येत ठीक नसल्याने प्रचाराला बाहेर पडू शकत नसल्याचे स्पष्ट करत, या स्थितीचा गैरफायदा घेऊन कोणीही चुकीची वक्तव्ये किंवा गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन केले आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ​आमदार केसरकर यांनी ठामपणे सांगितले की, ॲड. निता सावंत-कविटकर याच त्यांच्या शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. "माझी तब्येत ठीक नसल्याने प्रचाराला बाहेर पडू शकत नाही. याचा फायदा घेऊन चुकीची वक्तव्य होत असतील तर ते योग्य नाही. कुणीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये," असे ते म्हणाले. आज पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजपच्या प्रचार सभेत वक्तव्य केले होते. त्यावर बोलत होते. ​जेव्हा-जेव्हा त्यांच्या विरोधात कटकारस्थान झाले, तेव्हा-तेव्हा सावंतवाडीकर त्यांच्या मागे उभे राहिले आहेत. ते म्हणाले, "मी आजारी असताना गैरफायदा घेत असतील तर ते नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​आमदार केसरकर यांनी युती व्हावी म्हणून प्रयत्न केल्याचे सांगितले. "मी युती व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न केला. पालकमंत्र्यांना ओरोस येथे जाऊन भेटलो, पण पालकमंत्र्यांनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. युती झाली नसतानाही त्यांच्या ( माझ्या ) नावाने मत मागितली जात आहेत. "हे मतदारांनी हाणून पाडावे," असे आवाहन त्यांनी केले. युती झाली असती तर आपण राजघराण्याला पाठिंबा दिला असता, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ॲड. निता सावंत-कविटकर याच शिवसेना पक्षाच्या उमेदवार असल्याने पाठिंब्याचा प्रश्न येत नाही, असेही ते म्हणाले. ​जनतेच्या प्रेमामुळेच आपण चार वेळा आमदार झालो, असे सांगून त्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या २१ उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. ​ते म्हणाले, "माझ्या विरोधात गैरसमज करून कोणी तरी कटकारस्थान करत असेल तर जनताच ओळखून गैरसमज करणाऱ्यांचा कटकारस्थान उधळून लावेल. मला कोणीही घेरु दे, त्यातून अलगद वाचविण्याची ताकद जनतेत आहे."​"मी आजारी आहे त्यामुळे घरोघरी जाऊन भेट घेऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या नावाने मत मागाणाऱ्यांचा कट हाणून पाडा," असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार अनुभवी आणि सामाजिक कार्यात सहभागी होणारे आहेत.जनतेला २४ तास भेटणारा, समस्या सोडवणारा हवा. सहजासहजी भेटणारा नगराध्यक्ष असावा,तसे आमचे उमेदवार आहेत. त्यामुळे सावंतवाडीकर योग्य उमेदवाराला विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ​तत्कालीन मुख्यमंत्री, तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सावंतवाडीला भरघोस निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सावंतवाडीत दि .३० नोव्हेंबर रोजी प्रचाराला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. "मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा सावंतवाडीकर उत्तर देतात," असे सांगत त्यांनी लोकांना या विधानांना बळी न पडण्याचे आवाहन केले. ​यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अशोक दळवी, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg