loader
Breaking News
Breaking News
Foto

जिजाऊ संस्थेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मोफत डेमो पोलीस भरती

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्हा मर्यादित डेमो पोलीस भरतीचे आयोजन देवरुख येथे ए. एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानात दिनांक 30 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 6 वाजता घेण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर झालेल्या 15,000 पेक्षा जास्त जागांच्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर या डेमो भरतीचे आयोजन केले जात असून जिल्ह्यातील इच्छुक तरुणांना प्रत्यक्ष भरतीपूर्वी स्वतःचे मूल्यमापन करता यावे. त्यानंतर त्यात सुधारणा करता याव्यात जेणेकरून या भरतीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवती पोलीस प्रशासनात रुजू होतील या उद्देशानेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे साहेबांनी या डेमो भरतीचे आयोजन केले आहे. या डेमो पोलीस भरतीसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. कालपर्यंत या डेमो भरतीसाठी 1200 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झालेली आहे. जिजाऊ संस्थेच्या अनिवासी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत गेल्या पंधरा वर्षात जवळपास 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध प्रशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत.

टाइम्स स्पेशल

जिजाऊ संस्थेचे मोफत चालवले जाणारे एक निवासी प्रशिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथे सुरू आहे. याच धर्तीवर रत्नागिरी शहरात 100 विद्यार्थ्यांचे दुसरे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा सांबरे साहेबांचा मानस आहे. या डेमो पोलीस भरतीत पहिल्या 70 विद्यार्थ्यांना या निवासी मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश दिले जाणार आहेत. याशिवाय सध्या जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्ह्यात अनिवासी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी,लांजा, सापुचेतळे, देवरुख, गुहागर, जाकादेवी या ठिकाणी कार्यरत आहेत. जिजाऊ संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील 12 वी पास असलेल्या 18 ते 28 वयोगटातील युवक युवतींना या डेमो भरतीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्री.केदार चव्हाण (सचिव - जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र) 7208612222, ॲड. महेंद्र मांडवकर ( जिल्हाध्यक्ष - रत्नागिरी जिल्हा ,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र) 94232 92575

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg