loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तालुक्यात पुन्हा राजकीय भूकंप; तोराडी मोहल्ला ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

म्हसळा (वार्ताहर) - म्हसळा तालुक्यात पुन्हा राजकीय भूकंप झाला असून तालुक्यातील तोराडी मोहल्ला येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी भरत गोगावले यांचा कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मोजम हजवाने, मुनिर कौचाली, शाफिक हजवाने, मुज्जसिर हजवाने, अलिमिया हजवाने, संतोष पवार, समा पवार, सलीम हजवाने, निसार हजवाने, सरफराज हजवाने, अस्लम हजवाने, मुख्तार हजवाने, रिजवान पेवेकर, नासरुद्दीन हजवाने, जाहिद हजवाने, मोहमद कौचाली, इब्राहिम हजवाने आणी बहुसंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रवेश कार्यक्रम प्रसंगी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, माजी सभापती रवींद्र लाड, तालुका संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, उपतालुका प्रमुख बाबू बनकर, दीपेश जाधव, अमित महामुनकार, राजू चाळके, आणी शिवसैनिक उपस्थीत होते. यावेळी ना. गोगावले म्हणाले की, या पक्ष प्रवेशाने म्हसळा तालुक्यात शिवसेना पक्षाची ताकद वाढली असून येणाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये यांचा परिणाम नककी होईल. पक्ष प्रवेश केलेल्या सर्व मोहल्ला ग्रामस्थांचे शिवसेना पक्षात स्वागत. विभागातील विकासकामांना गती दिली जाईल. त्यांच्या मागण्यानुसार सर्व विकासकामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन यावेळी ना. भरत गोगावले यांनी प्रवेशकत्य्याना दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg