loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीच्या पर्यटन विकासाची गंगा आणण्याचे सामर्थ्य फक्त भाजपमध्ये : युवा नेते विशाल परब

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सावंतवाडी शहरात पर्यटनदृष्ट्या विकासाची गंगा यायला हवी आणि हे काम केवळ भाजपच करू शकते, असा ठाम विश्वास भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला आहे. सावंतवाडीची पर्यटनदृष्ट्या स्वतंत्र ओळख निर्माण झाल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल, असे मत त्यांनी मांडले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केसरी येथे मत्स्यालय प्रकल्प साकारून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे, असे परब यांनी सांगितले. ​केसरी गावात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी चव्हाण यांनी हा प्रकल्प सुरू केला. आज दैनंदिन शेकडो पर्यटक त्या ठिकाणी भेट देतात.​यामुळे स्थानिक तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध झाला आहे. ​एका प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, हे सिद्ध झाले आहे.​सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राजवाडा, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, विविध मंदिरे यांसारख्या पर्यटन स्थळांचा विकास करणे आणि रोजगार निर्माण करणारे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. असे झाल्यास शेकडो तरुण-तरुणींना या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. ​विशाल परब यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजपचे मजबूत नेतृत्व असल्याचा विश्वास व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी, ​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, ​प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, ​पालकमंत्री नितेश राणे हे सर्व नेते दूरदृष्टी ठेवून काम करणारे आहेत, असे त्यांनी नमूद केले.​ नगराध्यक्ष उमेदवार श्रध्दाराजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास; ​सुंदरवाडीचा अर्थात सावंतवाडी शहराचा पाया रचणाऱ्या राजघराण्याच्या सुनबाई श्रध्दाराजे भोसले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. त्या उच्चशिक्षित असून त्यांच्याजवळ विधायक दृष्टिकोन आहे. नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारही अभ्यासू, जाणकार आणि सामाजिक कार्यात सहभागी होणारे आहेत. ​त्यामुळे सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास आणि कायापालट करण्यासाठी हे सर्वजण निश्चितच अहोरात्र मेहनत घेतील, असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

प्रभागनिहाय गाठीभेटी घेऊन प्रचारात सहभाग घेतला असता लोकांनी परिवर्तनाची गरज लक्षात घेऊन भाजपला साथ देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. ​परंतु, यावेळी लोक मतदान करताना निश्चितच परिवर्तन घडवून आणणार आणि सावंतवाडी शहरात कमळ फुलणार, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. ​यावेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रध्दाराजे भोसले, माजी नगराध्यक्ष उमेदवार बबन साळगावकर, शहराध्यक्ष सुधीर आरीवडेकर, अँड अनिल निरवडेकर, विलास जाधव, आणि पदाधिकारी उपस्थित होते. ​"शहराच्या सर्वांगीण विकास, नागरी सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ, सुंदर सावंतवाडी करण्यासाठी भाजप हाच पर्याय जनता स्वीकारणार आहे," असे मत विशाल परब यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg