loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू मांडवे धरणप्रश्नी आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम

खेड (प्रतिनिधी):- तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या ४१ वर्षांपासून रखडला आहे. प्रकल्पाचा सुधारित मान्यता प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवून ४ महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रत्यक्षात कार्यवाहीच झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी २६ जानेवारी रोजी धरणाच्या ठिकाणीच आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यावर ते अजूनही ठाम असून तसे लेखी निवेदन कोकण विकास पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

किंजळे तर्फे नातू पुरे, तळे, कुडोशी या ५ गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने किफायतशीर ठरणारा न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या ४१ वर्षापासून रखडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोडच झाला आहे. या प्रकल्पासाठी जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेने प्रकल्पाच्या ठिकाणीच सातत्याने आंदोलनाचा मार्गही पत्करला होता. मात्र, बोळवण करण्यापलिकडे अद्याप काहीच झालेले नाही.

टाइम्स स्पेशल

संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासनही हवेतच विरले आहे. याच धरण प्रकल्पावर २ मेगावॅटचा वीज निर्मितीचा प्रकल्पही प्रस्तावित असून तोही कागदावरच आहे. याप्रसंगी नितीन जाधव, अविनाश जाधव, अशोक शेलार, गणेश जाधव आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg