loader
Breaking News
Breaking News
Foto

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये गुहागर तालुक्यातील प्रमुख मान्यवरांचा गौरव

वरवेली (गणेश किर्वे) - अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रामानंद सांप्रदाय ता. गुहागर, जिल्हा सेवा समिती रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील प्रमुख मान्यवरांचा गौरव करण्यात आला. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पाटपन्हाळे हायस्कूल समोरील कै. सदाशिव बापूशेठ वेल्हाळ सभागृह येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संत पिठावर माजी आमदार डॉ. विनय नातू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, शिवसेना गुहागर समन्वयक विपुल कदम, श्री दुर्गादेवी देवस्थान गुहागरचे अध्यक्ष किरण खरे, श्री व्याडेश्वर देवस्थान अध्यक्ष शार्दुल भावे, भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रामानंद सांप्रदाय ता. गुहागर, जिल्हा सेवा समिती रत्नागिरी यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा संत पिठावर सत्कार करण्यात आला. यावेळी रामानंद सांप्रदाय ता. गुहागर, जिल्हा सेवा समिती रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील दुर्बल घटक उपक्रमांतर्गत घरघंटीचे वाटप करण्यात आले. यामध्ये नारायण बाळकृष्ण राऊत, स्नेहा ज्ञानेश्वर गुडेकर, मधुरा रवींद्र नाटुस्कर, लक्ष्मी लक्ष्मण अवेरे, भारती पालशेतकर, सूर्यास्ता जाकले, कविता कृष्णा भुवड, परशुदा तांडेल, समीक्षा डिंगणकर, अंजनी हळये, उर्मिला बापू दळवी यांना देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांनी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg