loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यात तब्बल १७ कोटीच्या विविध विकास कामांच भुमिपूजन

खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील विविध गावातील १७ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि नानटे येथील आयुष्यमान आरोग्यमंदिर उपकेंद्राचे उद्घाटन आज नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. दापोली तालुक्याने मला मागील कित्येक वर्षे प्रेमाने सांभाळले आहे. इथून आमदार झालो, आमदार असल्याने मला हे राज्यमंत्री पद मिळाले विशेषतः ग्रामविकास राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक गावाचा विकास मला साधता येतो आहे आणि या विकासकामांची खरी प्रेरणा, ही आपल्या मतदारसंघात केलेल्या कामातून मिळते आहे. त्यामुळे दापोली तालुक्यातील शिवसेनेच्या बालेकिल्यांना निधीची कधीच कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज भूमिपूजन झालेली कामे पुढीलप्रमाणे १) कुंभारवाडी, जालगाव ग्रामदैवत श्री देव भैरीनाथ सान इमारत भूमिपूजन संपन्न. २) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तेरेवायंगणी गावठाण ते सडवली कोळबांद्रे रस्ता भूमिपूजन संपन्न. ३) नानटे येथील आयुष्यमान आरोग्यमंदिर उपकेंद्राचे उद्घाटन संपन्न. ४) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत आगरवायंगणी उसगाव रस्ता भूमिपूजन संपन्न. ५) घेवडवाडी, आगरवायंगणी येथे सभागृह उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न. ६) आगरवायंगणी ऊसगांव रस्ता माजबुतीकरण आणि डांबरीकरणाचे भूमिपूजन संपन्न. ७) वणौशी तर्फे पंचनदी - दुमदेव ग्रामपंचायत इमारत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न. ८) काजूवाडी, वणौशी तर्फे पंचनदी रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन संपन्न. ९) मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत दाभोळ, भिवबंदर ते आघारी तिवरेवाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, माजी जि.प. समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, माजी जि.प. समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, महिला संघटिका दीप्तीताई निखार्गे, जालगांवचे सरपंच अक्षय फाटक, गाव अध्यक्ष अशोक जालगांवकर, उपाध्यक्ष रमेश कडु, तेरेवायंगणी ग्रामीण अध्यक्ष शंकरजी शिगवण, उपकेंद्र नानटेचे डॉ. क्षीरसागर, आगारवायंगणीचे सरपंच संतोष आंबेकर, वणौशी तर्फे पंचनदीच्या सरपंच प्रतिभाताई दवंडे तसेच पक्ष पदाधिकारी, संबंधित अधिकारी समस्त गावातील ग्रामस्थ बंधु-भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg