loader
Breaking News
Breaking News
Foto

पेवे गावातील निर्भिड व्यक्तिमत्व असलेले खालिदभाई सरगुरोह अपक्ष म्हणून निवडणूक लढणार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पेवे विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन, राष्ट्रवादीचे माजी तालुका उपाध्यक्ष, ग्रामपंचायत पेवेचे माजी सदस्य, तालुक्यातील ज्येष्ठ युवा सामाजिक कार्यकर्ते व निर्भिड व्यक्तिमत्व असलेले खालिदभाई रज्जाकखान सरगुरोह यांनी आगामी होवू घातलेल्या जि.प. निवडणुकीमध्ये असगोली या सर्वसाधारण जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही फक्त राजकीय पक्षांचे झेंडे लावणे, राजकीय नेत्यांना "आगे बढो"च्या घोषणा देणे तसेच राजकीय नेत्यांच्या सभा झाल्यानंतर सतरंजा उचलण्याचे काम करायचे काय.?

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

असगोली जिल्हा परिषद गट हा खुल्या वर्गासाठी आरक्षित असल्याने आपण या गटातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत. या गटातील दोन्ही पं.स. गणात आपला चांगला जनसंपर्क असून गेले अनेक वर्षे आपण या भागात विविध माध्यमातून प्रमाणिकपणे समाजसेवा केलेली आहे. निवडणुका आल्या की, प्रस्तापित लोक निवडणुकीचे उमेदवार असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचारच कोणताही राजकीय पक्ष करत नाही. म्हणूनच या वेळी मला काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे.

टाईम्स स्पेशल

या लोकांच्याच विनंतीला व आग्रहाला मान देऊन मी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मी २००७ साली याच गणातून पं.स. निवडणूक लढविली होती. माझा निसटता पराभव झाला होता, परंतु मतदारांनी माझ्या झोळीत २१०० मतदान करुन माझ्यावर विश्वास दाखवला होता. याच लोकांच्या पाठींब्यावर मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg