loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत क्रिकेट महोत्सवाचा खेळाडू लिलाव सोहळा उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी प्रीमियर लीग (एसपीएल) सीझन २.० आणि निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या बहुप्रतीक्षित क्रिकेट महोत्सवाचा खेळाडू लिलाव उत्साहात पार पडला. लिलावानंतर भव्य ट्रॉफी अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार्‍या या भव्य क्रिकेट स्पर्धेबाबत परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष सुधीर आरीवडेकर, लायन्स क्लबचे अमेय पै, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, उद्योजक भुषण बांदिवडेकर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बांदिवडेकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, तसेच आयोजक शरद बांदिवडेकर, जयेश बांदिवडेकर, यशवंत बांदिवडेकर, अमर बांदिवडेकर, सर्वेश नाईक, समीर केरकर, रुपेश मयेकर, सर्वेश पायनाईक, सूरज शिरोडकर, बाप्पा तानवडे‡आणि निरवडे येथील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांच्या प्रेरणादायी संदेशांमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी वातावरण प्राप्त झाले. ट्रॉफी अनावरणाच्या क्षणी सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचा एक वेगळाच संचार झाला. आगामी स्पर्धेत विविध संघांकडून रोमांचक सामने पाहायला मिळणार असून, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही लीग एक मोठे व्यासपीठ ठरणार आहे. आयोजकांनी सर्व क्रिकेटप्रेमींना ३ ते ७ डिसेंबर दरम्यान होणार्‍या या क्रिकेट पर्वाचा आनंद घेण्यासाठी आवाहन केले आहे. संपूर्ण सोहळा लक्ष्मण उर्फ आना गावकर यांचा शालू मंगल कार्यालय येथे पार पडला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg