loader
Breaking News
Breaking News
Foto

भिवंडीत काल्हेर भागात कापड गोदाम भीषण आगीत जळून खाक

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यात भिवंडी येथील काल्हेर भागात बांगर नगर परिसरातील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे कापड गोदामाला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीत गोदाम जळून खाक झाले. लागलेली आग दहा तासांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका कपड्याच्या गोडाऊनला आग लागली होती. गोदामात कापड असल्याने अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. परिसरात आगीचे आणि धुराचे लोट पसरू लागल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. सदर घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी, भिवंडी-निजामपूर अग्निशमन दलाचे जवान, ठाणे म.न.पा. अग्निशमन दलाचे जवान, नवी मुंबई अग्निशमन दलाचे जवान, कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान, उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह उपस्थित होते. ठाणे अग्निशमन दलाचे जवान ०१- वॉटर टँकर वाहनासह उपस्थित होते. उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित होते. नवी मुंबई अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह उपस्थित होते. कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह उपस्थित होते. या आगीत कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी या आगीमुळे गोदामाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. सदरची आग कशी लागली? याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg