loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड : म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील रामजीवाडी, खोपी परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेत बाबाराम मालसिंग ढेंबे (वय ३६) या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, बाबाराम ढेंबे हे दररोजप्रमाणे आपल्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी पिंपळवाडी लपा योजना (धरण) परिसरात गेले होते. दुपारी १२.१५ च्या सुमारास त्यांनी म्हशींना पाणी पाजण्यासाठी धरणात उतरल्यावर अनपेक्षितरीत्या त्यांचे पाय चिखलात घट्ट अडकले. चिखलाचा मुरूम आणि पाण्याचा दाब यामुळे ते स्वतःला बाहेर खेचू शकले नाहीत. सुरुवातीला परिस्थिती सामान्य वाटत असली, तरी काही क्षणातच बाबाराम यांचा तोल गेला आणि ते पाण्यात ओढले गेले. हात-पाय हलवून त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु चिखलाचा घट्टपणा आणि पाण्याची खोली यामुळे ते सुटू शकले नाहीत. काही मिनिटांतच ते पाण्यात बुडाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती परिसरातील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तातडीने धरणाकडे धाव घेतली. अनेकांनी मिळून जीव तोडून प्रयत्न केले आणि जवळपास दोन तासांच्या शोधानंतर, ढेंबे यांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात याची नोंद ‘आकस्मित मृत्यू’ म्हणून करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बाबाराम ढेंबे यांच्या निधनाने रामजीवाडी तसेच खोपी परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg