loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आमदार कै.तात्यासाहेब नातूंना आदरांजली म्हणून ही जागा भाजपला : पालकमंत्री उदय सामंत

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर येथील नगरपंचायत निवडणुकीच युतीचा विजय हा निश्चित आहे. या विजयाच्या मिरवणुकीलाच निधी घेवून येईन आणि पुढील पाच वर्ष गुहागर नगरपंचायतीला निधी कमी पडू देणार नाही. स्व. तात्या नातूंना आदरांजली म्हणूनच गुहागरची नगराध्यक्ष पदाची जागा आम्ही भाजपला दिली आहे. आणि कशेडीपासून खारेपाटण पर्यंतच्या भागात आपण सर्व निवडणुका युती म्हणूनच लढत आहोत. असे प्रतिपादन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी गुहागरमध्ये केले.गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी युतीची प्रचार सभा आज किर्तनवाडी समाज मंदिरात झाली. या प्रचारसभेला राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, माझ्या २५ वर्षांच्या राजकारणात मी युती करण्याएवढा मोठा कधीच झालो नव्हतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला युतीची बोलणी करण्याएवढे मोठे केले. त्यावेळी मला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटलजी, प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंढे यांनी शिवसेना भाजप युती कशी केली याची आठवण झाली. तशा प्रकारची युती करण्याचे भाग्य मला मिळणार होते म्हणून मी रत्नागिरी जिल्ह्यात युती करण्याच्या मतावर ठाम होतो. कार्यकर्त्यांनी खारेपाटणच्या पलीकडे पाहू नये किंवा कशेडीच्या पलीकडे पाहू नये. युती म्हणून आपला जिल्हा मी केंद्रशासीत केला आहे. प्रचार सभेला कंपनीतून रस्त्याने इथपर्यंत येताना माझाही मणका साफ झाला आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो की परत येण्यापूर्वी गुहागर तालुक्यातील रस्ते गुळगुळीत झालेले असतील. निरायम हॉस्पीटल पुन्हा सुरु करण्याचे आश्वासन मी विसरलेलो नाही. गुहागर तालुकावासीयांना चांगले मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल निरायमच्या रुपाने मिळाले म्हणून मी प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना विघ्नसंतोषी लोकांनी सफल होऊ दिले नाही. हे रुग्णालय व्हावे हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे आजही कंपनीच्या अधिकाऱ्यांना येथील रुग्णालय चालू करण्याबाबत सूचना दिल्या आहे यानंतरही सरळपणे निरामयचे काम मार्गी लागले नाही तर थेट जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ही सर्व जागा शासनाच्या ताब्यात घेणार आहे. त्यानंतर तिथे रत्नागिरीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे उत्तम आरोग्य सुविधा असलेले हॉस्पिटल सुरु होईल हे माझे वचन आहे.गुहागरमधील भाजपचा नगराध्यक्ष आणि युतीचे नगरसेवक निवडून येणार हे नक्की आहे. सर्व उमेदवारांनी सकारात्मक विचार करुन मी या शहराला काय देऊ शकतो याचा विचार करावा. विरोधकांवर टिका करुन त्यांना कमी लेखून, त्यांची निंदा करुन मते मिळविण्यापेक्षा मी भ्रष्टाचारी होणार नाही. अशी शपथ सर्वांनी घ्यावी. युतीचे सर्व उमेदवार निवडून येतील याची खात्री आहे. त्यानंतर या नगरपंचायतीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा संघटक महेश नाटेकर, माजी आमदार संजय कदम, मुंबई महानगरपालीकेचे माजी नगरसेवक यशवंत जाधव, राजेंद्र महाडिक, विपुल कदम, राजेश बेंडल, विलास वाघे, सौ. नेत्रा ठाकूर, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, युवा जिल्हा संघटक अमरदिप परचुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतिश मोरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, सुरेश सावंत, दिप्ती असगोलकर, प्रांचली कचरेकर, नरेश पवार, प्रदीप बेंडल यांच्यासह युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg