loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत मोफत ॲडव्हान्स कराटे ट्रेनिंग शिबिराला यशस्वीरीत्या सुरुवात

रत्नागिरी - रत्नागिरी कराटे असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला मोफत ऍडव्हान्स कराटे ट्रेनिंग कॅम्प उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या सुरु सुरू करण्यात आला. त्यावेळी तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी सहभागी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या व स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच कराटे संघटनेच्या पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या व कराटे प्रशिक्षकांनी कॅम्पदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना काताकुमिते, स्पर्धात्मक कराटेचे नियम तसेच स्वसंरक्षण, याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य, तंदुरुस्ती तसेच आत्मविश्वास वाढल्याचे जाणवले. परिसरातील अनेक शाळा, कॉलेजातील कराटेप्रेमी विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. कॅम्पचे आयोजन २३, ३० नोव्हेंबर आणि ७ व १४ डिसेंबर २०२५ या दिवशी बॅडमिंटन हॉल, क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुतीमंदिर, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

कॅम्पचे प्रशिक्षण रत्नागिरीतील नामवंत कराटे प्रशिक्षक जावेद मिरकर, सूरज बने, अरुण बेग यांनी प्रभावीपणे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना कराटेचे काता, कुमिते आणि स्वसंरक्षणाचे उत्कृष्ट प्रशिक्षण मिळाले. तसेच सहाय्यक कराटे प्रशिक्षक नौशीन कापडी, तेजस जाधव, अयान मिरकर, रिया माचकर, दिव्य यादव, ध्रुव बसणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे, तसेच या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन कराटे या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा असे कराटे एसोसिएशन रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, या संस्थेमार्फत आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे रत्नागिरीतील कराटे खेळाला मोठे प्रोत्साहन मिळाले असून भविष्यात असे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याची मागणी पालक वर्ग करत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg