loader
Breaking News
Breaking News
Foto

ए.जी.हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला उस्फुर्त प्रतिसाद

दापोली (प्रतिनिधी) - व्यसन आणि अंमली पदार्थांच्या वाढलेल्या सेवनामुळे अनेकांचे जीवन धोक्यात आले आहे. व्यसन प्राणघातक असते, ज्यामुळे असाध्य रोग, अपंगत्व, वेदना आणि अकाली मृत्यू होतो, सोबतच आर्थिक नुकसान, सामाजिक प्रतिष्ठा खराब होऊन घरगुती वाद, मानसिक त्रास होतो. ही समाजातील वास्तवाता दुर करण्यासाठी समाजात व्यसन आणि अंमली पदार्थांच्या वाढलेल्या सेवनाला पायबंद बसावा या उद्देशाने ए.जी.हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या विद्यार्थ्यांनी दापोली एस. टी स्टँड च्या आवारात व्यसनमुक्ती जन जागृती पथनाट्य सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या या व्यसनमुक्ती पटनाटयाच्या सादरीकरणाला प्रवासी वर्गासह उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाचा उस्फुर्त प्रतिसाद साद दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जगात खाण्यासाठी हजारो स्वादिष्ट आरोग्यदायी पदार्थ आहेत, तरीही लोक नशेसाठी आपले मौल्यवान जीवन वाया घालवतात. तंबाखू हे असे विष आहे जे देशात अगदी कमी किमतीत सहज उपलब्ध आहे, ज्याचे सेवन समाजातील सर्व वयोगटातील लोक करताना दिसतात. नेहमी घरातील वयोवृद्ध मंडळी किंवा पालक मुलांसमोर तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना दिसतात, ज्याचा थेट वाईट परिणाम मुलांवर होतो. तंबाखूची नशा शरीरात मंद विषासारखी काम करते, जे शरीराला घातक रोगांची लागण करून मारते. यासाठी व्यापकपणे समाजात जनजागृती आणि व्यसनमुक्ती झाली तर निश्चितपणे लाखो लोकांचे प्राण वाचवू शकते.

टाईम्स स्पेशल

या अर्थाने लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ए.जी.हायस्कुलचे शिक्षक संतोष येलवे यांनी समाजभान लक्षात घेऊन वास्तव लिहिलेल्या पथनाट्याचा ए.जी.हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज दापोलीच्या विद्यार्थ्यांनी दापोली एस.टी. स्टॅण्ड आवारात पथनाटयाचे उत्तमरित्या सादरीकरण केले. याकामी शिगवण आणि केतकर या शिक्षकवृंदाचे सहाय्य मिळाले. दापोली एस.टी.सृटक्टड च्या आवारात सादरीकरण करण्यात आलेल्या या पथनाट्याच्या सादरीकरणाला प्रवाशी वर्ग तसेच चालक वाहक तसेच अधिकारी वर्गाने टाळयांचा कडकडाट करत विद्यार्थ्यांना प्रतिसादाची उस्फुर्त दाद दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तर मिळालेच शिवाय जनमानसातही अंमली पदार्थ सेवनाविरोधी चांगलीच जनजागृती झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg