loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणच्या विकासाचा ‘अष्टसूत्री संकल्प’ या व्हिजन डॉक्युमेंटचे आमदार निलेश राणे यांच्याकडून सादरीकरण

मालवण (प्रतिनिधी) : चार दिवसापूर्वी मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मालवणच्या शिवसेना मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे मालवणातील नागरिकांच्या बैठकीत विकासाचे रोल मॉडेल सादर करताना आमदार राणे यांनी शहर विकासाचा अष्टसूत्री संकल्प जाहीर केला. यामध्ये मालवणातील ऐतिहासिक पर्यटन आणि वारसा जतन, मालवण मरीन ड्राईव्ह आणि आधुनिक शहर संकल्पना, पायाभूत सुविधा व जलव्यवस्थापन, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण, शिक्षण कौशल्य आणि रोजगार निर्मिती, कला मनोरंजन आणि क्रीडा त्याचप्रमाणे पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन अशी अष्टसूत्री मांडताना आमदार राणे यांनी मालवण शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्व्यक महेश कांदळगावकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर, जेष्ठ डॉक्टर शशिकांत झाट्ये, डॉ. राहुल वालावलकर, डॉ. अजित लिमये, डॉ. अविनाश झाट्ये, व्यापारी नितीन तायशेट्ये, शिवसेना सरचिटणीस दादा साईल, संजय पडते, नगराध्यक्षा उमेदवार सौं. ममता वराडकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, शहर प्रमुख पुनम चव्हाण, शिवसेना नगरसेवक उमेदवार यांसह नाना साईल, राजन सरमळकर, विलास सामंत, दामू तोडणकर, राजा गांवकर, अभय कदम, विश्वास गावकर, किसन मांजरेकर, रोटरी क्लब, लायन्स क्लब पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व अन्य उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांनी दर्जेदार वैद्यकीय सेवा, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, सोबतच मालवणला जोडणारे प्रमुख रस्ते सातत्याने खड्डेमय होत असतात. यावर उपाय म्हणून त्याची सॉईल टेस्ट करून दर्जेदार रस्ते बांधणी सुरु करण्यात आली आहे. भूमिगत विज वाहिन्या, सबस्टेशन, ट्रान्सफार्मर या माध्यमातून विजेचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकूणच विकास होत असताना कुठल्याही घराला, नागरिकाला बाधा येणार नाही हेच आपले प्रयत्न राहतील. दर्जेदार शहर बनत असताना याठिकाणी ड्रग्स कल्चरला थारा नसेल. एक आदर्श मालवण शहर बनविले जाईल असे स्पष्ट केले. आमदार निलेश राणे यांच्या मालवण शहर व्हिजन डॉक्युमेंट बाबत डॉक्टर शशिकांत झाट्ये, डॉ. राहुल पंत वालावलकर यांनी नागरिकांच्यावतीने प्रतिनिधिक स्वरूपात विचार मांडताना आमदार निलेश राणे यांच्या व्हिजनचे कौतुक केले. यावेळी दत्ता सामंत म्हणाले, अभिमान वाटावे असे निलेश राणे यांचे कार्य राणे साहेब यांच्याप्रमाणे सुरु असून ते जागतिक दर्जाचे मालवण शहर बनवतील असा विश्वास व्यक्त केला. मालवणच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांचे हात बळकट करूया असे आवाहन यनिमित्ताने करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

1. किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाची दर्शन घडवणारी भव्य शिवसृष्ठी उभारणी, तसेच सिंधुदुर्ग किल्ला सुशोभीकरण ऑडिओ, व्हिडीओ लाईट साउंड शो, सागरी पर्यटनांचा नजारा पाहण्यासाठी रोपवे प्रकल्प उभारणे, या सोबतच सांस्कृतिक वारसा स्थळांचा पुनर्जीवन कला व संस्कृती केंद्र माध्यमातून ऐतिहासिक ओळख जपण्याचा प्रयत्न केला जाईल. 2. किनारपट्टी विकास मुंबईच्या मरीन ड्राइव्ह धर्तीवर भव्य समुद्री बंधारा व वाहतूक मार्ग. प्रशस्त रस्ते, मुक्त प्रेक्षा गृह, सुसज्ज मुक्त व्यायाम शाळा, आकर्षक सी व्हिव डेक, जॉगिंग ट्रॅक, यासोबतच रॉक गार्डन पुनर्जीवन करून सुशोभीकरण केले जाईल. 3. २४ तास पाणी पुरवठा प्रत्येक घरात मिळाले पाहिजे यासाठी योजना राबविणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभारणे. सांडपाण्याचे व्यवस्थापन व रस्ते व गटारांची योग्य पद्धतीने निर्मिती केली जाईल. 4. मालवण शहराला शंभर टक्के कचरा मुक्त करणे, जागतिक दर्जाचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी, घनकचरा वर्गीकरण व विल्हेवाट लावणे. आवश्यक साधनसामुग्री व मनुष्य बाळाची वाढ करणे. 5. मालवण शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देवबाग कडून येणार्‍या मार्गांवरून तसेच कोळंब सागरी मार्गाच्या दिशेने बाहेर जाण्यासाठी बायपास करणे, वायरी गावकर वाडा जोडरस्ता बनविणे, फोवकांडा पिंपळ ते देऊळवाडा रस्ता, बाजारपेठ मार्ग कॉंक्रीटीकरण करणे, प्रभावी रहदारी व्यवस्थापण व पार्किंग उभारणी करणे. 6. युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, इंटरनॅशनल स्कुल आणि एमबीए कॉलेज, एमपीएससी आणि युपीएससीसाठी सुसज्ज मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन व्यवस्थापण, प्रशिक्षण केंद्र व पायलट ट्रेनिंग एकादमी यासाठी प्रयत्नशील राहणार. 7. अत्याधुनिक सिनेमा मल्टीप्लेक्स उभारणी, मामा वरेरकर सभागृहाचे आधुनिकिकरण आणि बहुउद्देशिय सभागृहाची उभारणी, आधुनिक व सुसज्ज क्रीडा संकुल उभारणी होणार. 8. प्रामाणिक पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभार हेच आमचे लक्ष असेल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरोथान मधून मोठी वाढ होईल. २४ तास कार्यरत असणारा तक्रार निवारण कक्ष स्थापित होईल. मोकाट व भटक्या जनावरासाठी आडारी कचरा डेपो येथ मुक्त कोंडवाडा उभारून जनावरांचे संगोपन होईल. सुमारे ५ हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि संगोपन केंद्र उभारले जाईल, असे व्हिजन सादरीकरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg