loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'कमळ' फुलणार - भाजपचे युवा नेते विशाल परब

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीला मोठे बळ मिळाले आहे. येथील माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी आणि माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी आपल्या असंख्य प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपचा विजय निश्चित झाल्याचा दावा युवा नेते विशाल परब यांनी केला आहे. ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप देशभरात आपली विजयी पताका फडकवत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात तसेच कोकणात खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदा व नगरपंचायतींवर कमळ फुलवण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत, असे विशाल परब म्हणाले. ​सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी पक्षाने युवा नेते विशाल परब व वेदिका परब यांच्यावर सोपवली आहे. त्यांनी अहोरात्र प्रचार यंत्रणा राबवत अनेक दिग्गजांसह असंख्य राजकीय कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्याचा धडाका लावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सावंतवाडीतील वैश्यवाडा येथील माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी आणि प्रभाग क्रमांक तीनमधील माजी नगरसेविका शुभांगी सुकी यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ​या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार भाजप युवा नेते विशाल प्रभाकर परब, वेदिका विशाल परब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा लखम सावंत भोसले, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, प्रदेश सदस्या संध्या तेरसे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, जिल्हा कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी शर्वणी गावकर, उमेदवार आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, उदय नाईक, मनोज नाईक, जि. प. अध्यक्ष श्वेता सावंत, सभापती मानसी धुरी, रंगनाथ गवस, रवि मडगावकर, अमेय पई, बाळू सावंत, पप्पू कदम, संतोष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपचे नेते विशाल परब यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांचा विजय श्री देव पाटेकरांच्या आशीर्वादाने निश्चित असल्याचे यावेळी सांगितले. हा प्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे सावंतवाडी नगरपरिषदेवर 'कमळ' फुलवण्याचा पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg