loader
Breaking News
Breaking News
Foto

शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्याने पटकावले सुवर्ण पदक

खेड (प्रतिनिधी) - जिल्हा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्या विद्यमाने तथा जिल्हा कीडा परिषद मार्फत आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय किक बॉक्सिंग (१४, १७ व १९वर्षे मुले/मुली) स्पर्धा २०२५-२६ मध्ये सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेतील १९वर्षे वयोगटातील कु. हर्षल संतोष भोर याने १ सुवर्णपदक जिंकून राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. याच वयोगटात कु. दर्शन सुरेश पाटील याने १ रजत पदक तर कु. अथर्व विनोद चोरट व कु. आर्यन गोपाळ खेत्री यांनी २ कांस्य पदके पटकावली आहेत. तसेच सदर स्पर्धेत वय वर्षे १७ गटातील कु. मंथन फुलसिंग बघेल याने कांस्य पदक मिळविले आहे आणि १४ वर्षे वयोगटातील कु. हर्ष गिरीश साळुंखे १ रजत पदक व कु. श्रेयस प्रविण लांगी याने १ कांस्य पदक पटकाविले आहे. सदर स्पर्धेकरीता प्रशालेतील खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून विलास मोरे (सेवानिवृत्त सुभेदार मेजर) यांचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे संस्थापक रामदासभाई कदम तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. ज्योती रामदास कदम तसेच राज्याचे गृहराज्यमंत्री ना.योगेश रामदास, संस्था खजिनदार काशिराम सकपाळ व सर्व संस्था सदस्य यांनी अभिनंदन केले. तसेच प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन, प्राचार्य डॉ.खोत व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg