loader
Breaking News
Breaking News
Foto

'ठाकरे' गटाकडून सावंतवाडी नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल!

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी आज, श्री देव पाटेकर आणि श्री देव उपरलकर यांचा आशीर्वाद घेऊन सावंतवाडी नगर परिषदेत आपले एबी फॉर्म दाखल केले. फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी जोरदारपणे आपल्या प्रचाराचा शुभारंभही केला. ​आगामी निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोणावरही टीका-टिप्पणी न करण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे. "एकच ध्यास शहराचा विकास आणि प्रभागांमधील विकास करण्याचे ध्येय धोरण लक्षात ठेवून नगराध्यक्ष सिमा मठकर यांच्यासह आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील," असा ठाम विश्वास यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि युवा सेना तालुकाप्रमुख तथा सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी व्यक्त केला. ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरुवात केल्यामुळे सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणात चांगलीच रंगत येणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

विकासाच्या मुद्द्यावर लढणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg